मुलीची छेड काढणाºयास परभणीत जमावाने बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:05 IST2017-09-08T00:05:26+5:302017-09-08T00:05:26+5:30
आॅटोरिक्षामध्ये बसून घराकडे जाणाºया युवतीला चाकूचा धाक दाखवून छेडछाड करणाºया युवकास जमावाने बदडल्याची घटना शहरातील जिंतूर रोडवरील नूतन विद्यालय परिसरात ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५़३० च्या सुमारास घडली़

मुलीची छेड काढणाºयास परभणीत जमावाने बदडले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आॅटोरिक्षामध्ये बसून घराकडे जाणाºया युवतीला चाकूचा धाक दाखवून छेडछाड करणाºया युवकास जमावाने बदडल्याची घटना शहरातील जिंतूर रोडवरील नूतन विद्यालय परिसरात ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५़३० च्या सुमारास घडली़
परभणी शहरातील बालाजी नगर कॉलनी भागातील एक महाविद्यालयीन युवती बुधवारी सायंकाळी ५़३० च्या सुमारास आॅटोने घरी जात होती़ आॅटो नूतन विद्यालयाच्या मैदानाजवळ आला असता चालकाने इतर प्रवासी घेण्यासाठी आॅटो उभा केला़ त्यावेळी या युवतीच्या ओळखीचे दोन युवक दिसल्याने ही युवती त्या युवकांना बोलत असताना आरोपी मोहन शेषराव गुजर हा त्याच्या अन्य एका साथीदारासह तेथे आला व त्याने सदरील युवतीची छेड काढण्यास सुरुवात केली़ या युवतीने त्याला विरोध केला असता, आरोपीने त्याच्याजवळील चाकू काढून धमकावले व आॅटो चालकाला मी जिथे जात आहे तेथे आॅटो घेऊन चल असे सांगितले़ त्याचवेळी चालकाने आॅटो पुढे नेला़ तेव्हा या आॅटोचा पाठलाग करून आरोपी युवकाने जाम नाका कॉर्नर परिसरात हा आॅटो थांबवून पुन्हा त्या युवतीची छेडछाड सुरू केली़ यावेळी सदरील युवतीने आरडाओरडा केला असता, परिसरातील नागरिक जमले व त्यांनी या युवकाला पकडले़ त्यावेळी त्याने या नागरिकांशी हुज्जत घातली़ त्यानंतर उपस्थित नागरिकांनी त्याला चांगलेच बदडले़ तेथून त्याला कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले़ याबाबत पीडित युवतीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे आरोपी मोहन गुजर याच्याविरूद्ध यापूर्वीही एका महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे़ दरम्यान, पोलिसांनी आरोपी मोहन गुजर याला न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.