शहर स्वच्छतेला देणार प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 00:14 IST2017-06-07T00:11:01+5:302017-06-07T00:14:52+5:30

नांदेड: शहर स्वच्छ व सुंदर करण्याला आपली प्राथमिकता राहणार प्रतिपादन महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी केले़

Prefer to give cleanliness to the city | शहर स्वच्छतेला देणार प्राधान्य

शहर स्वच्छतेला देणार प्राधान्य

शहर स्वच्छतेला देणार प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शहर स्वच्छ व सुंदर करण्याला आपली प्राथमिकता राहणार असून त्यानंतर प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यावर भर देण्यात येईल असे प्रतिपादन महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी केले़
आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देशमुख यांनी पत्रपरिषद आयोजित केली होती़ ते म्हणाले, गेल्या २१ वर्षाच्या शासकीय सेवेत अनेक चढ-उतार पाहिले़ परंतु कायद्याला सर्वोच्च मानत आजपर्यंत कोणत्याही मुद्यावर तडजोड केली नाही़ गेल्या दोन दिवसात मनपा कारभाराची माहिती घेतल्यानंतर देशमुख म्हणाले, शहरातील स्वच्छतेच्या विषयावर लक्ष देण्याची गरज आहे़ त्यानंतर इतर विकास कामे करण्यावर भर राहिल़
स्वच्छतेचे काम करणाऱ्या एटूझेडला हटविण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते़ ती करण्यात आली नाही़ परंतु लवकरच निविदा काढून शहर स्वच्छतेचे कंत्राट देण्यात येणार आहे़ पावसाळापूर्व नालेसफाईसाठी चारही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून लवकरच शहरातील सर्व नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे़
नांदेड शहराला सोलार सिटी बनविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़ त्याअंतर्गत एलईडी स्ट्रीट लाईट लावण्यात येणार आहेत़ तसेच शहर बस वाहतुक सेवा पूर्णपणे कोलमडली आहे़ शहरातील प्रवाशांसाठी ही सेवा सुरु करण्यासाठी लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील़
शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे बॅनर लावण्यात आले आहेत़ अशाप्रकारे बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी मनपा कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात येणार आहे़ याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे़ असेही आयुक्त देशमुख म्हणाले़

Web Title: Prefer to give cleanliness to the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.