शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
3
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
4
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
5
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्याधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
6
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
7
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
8
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
9
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
10
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
11
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
12
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
13
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
14
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
15
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
16
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
17
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
18
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
19
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
20
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

चिमुकल्यांचे भावविश्व उलगडणाऱ्या ‘ई-आकार’ने जोडले ४४ हजार पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 19:10 IST

लहान मुलांच्या आकलनासाठी स्पर्धा घेतल्या जातात. त्यातून प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जात असल्याने पालकांचाही सहभाग वाढत आहे.

ठळक मुद्देचिमुकल्यांचे भावविश्व उलगडण्यात रॉकेट लर्निंगची मदत१० जूनला या उपक्रमाची सुरुवात झाली.

औरंगाबाद : लहान मुलांसाठी पहिले सहा वर्षे महत्त्वाचे. त्यातही ३ ते ६ वर्षांदरम्यान मुले पूर्वप्राथमिक शिक्षणात भोवतालची परिस्थिती संवेदनांचे धडे अंगणवाडीत गिरववात. मात्र, कोरोना, लॉकडाऊनमुळे अंगणवाडी भरत नाही. जिल्ह्यातील अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांसाठी ई-आकार प्रकल्प सुरू केला. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ४४ हजार पालकांना जोडले आहे. त्यापैकी २८ हजार पालक दररोजच्या खेळातून शिक्षणाच्या उपक्रमातील कृतीत सक्रिय सहभाग नोंदवत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.

जिल्ह्यात ३४५५ अंगणवाड्या आहेत. त्यासाठी ३३६० अंगणवाडी सेविका, ८० सुपरवायझर, १४ बालविकास प्रकल्प अधिकारी आणि दिल्लीतील रॉकेट लर्निंग या आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी अवतीभोवतीच्या वस्तूतून खेळ, संवेदना आणि मातांसोबत पुरुष पालकांचा बालकांच्या वाढीत हातभार लावण्यासाठी हा उपक्रम सुरू झाला. ई आकारसाठी एक अभ्यासक्रम रॉकेट लर्निंगच्या मदतीने ठरवून १० जूनला या उपक्रमाची सुरुवात झाली. त्याअगोदर सर्व अंगणवाडी सेविकांना आॅनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. दररोज मुलांना दोन कृती दिल्या जातात. त्यामध्ये विविध उपक्रमांतून मुलांना आकार, रंग, गंध, व्यवहारज्ञानाचे आकलन होईल. त्यात पालकांचा सहभाग असेल असा व्हिडिओ तयार करून मागवला जातो. असे २८ हजार पालक दररोज व्हिडिओ किंवा दिलेले टास्क पूर्ण करताहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, या विभागाच्या सभापती अनुराधा चव्हाण याकडे विशेष लक्ष देत असून अंगणवाडी सेविका मोबाईल नसतील अशा पालकांना त्यांच्या मोबाईलवरून टास्क पूर्ण करण्यासाठी मदत करत असल्याचे मिरकले यांनी सांगितले.

स्पर्धा, प्रोत्साहनामुळे २८ हजार पालकांचा प्रतिसादमंगळवारी या उपक्रमाचा ७६ वा दिवस होता. दररोज पालकांनी मुलांना किमान २० मिनिटे वेळ द्यावा. पाल्य व पालकांनी बनवलेले व्हिडिओ ग्रुपवर येतात. एकमेकांचे बघून सर्वच तसा प्रयत्न करतात. त्यातून निवडक उत्कृष्ट व्हिडिओंचा एक आकार टीव्ही नावाने व्हिडिओ बनवून पुन्हा पालकांकडे पाठवले जातात. लहान मुलांच्या आकलनासाठी स्पर्धा घेतल्या जातात. त्यातून प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जात असल्याने पालकांचाही सहभाग वाढत आहे. शिवाय गरोदर माता, किशोरी, स्थनदा मातांपर्यंत संदेश पोहोचवण्याची सक्षम यंत्रणा यातून उभी राहिली असल्याचे मिरकले यांनी सांगितले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाAurangabadऔरंगाबाद