शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून पूर्व तपासणीत धरणांचा आताच धोका, पण 'डॅम सेफ्टी ॲक्ट' नुसार दुरुस्ती पुढील वर्षी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:22 IST

धोकदायक धरणांचा अहवाल आल्यानंतर नाशिक येथील धरण सुरक्षा संघटनेचे अभियंत्यांचे पथक कॅटेगिरी १ आणि २ मधील प्रकल्पांची तांत्रिक तपासणी करतात.

- बापू सोळुंके

छत्रपती संभाजीनगर : लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा)च्या कार्यक्षेत्रांतील आठ धरणे धोकादायक असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या मान्सूनपूर्व धरण तपासणीत आढळून आले आहे. या धरणाची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचा अहवाल नाशिक येथील राज्य धरण सुरक्षा संघटनेला पाठविण्यात आला, पण दुरुस्तीसाठी एक वर्षाहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता ‘कडा’च्या उच्चपदस्थ सूत्रांनी वर्तविली.

नॅशनल डॅम सेफ्टी ॲक्ट आणि स्टेट डॅम सेफ्टी ॲक्ट आल्यापासून राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. दरवर्षी मान्सूनपूर्व तांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश आहेत. अतिधोकादायक स्थितीतील धरणांचा समावेश कॅटेगिरी एक मध्ये, तर मध्यम धोकादायक धरणांची कॅटेगिरी दोन आणि किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या धरणांचा समावेश कॅटेगिरी तीनमध्ये करण्यात आला. ‘कडा’च्या वतीने छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यातील १२६ धरणांची तपासणी करण्यात आली. यापैकी ८ धरणे कॅटेगिरी २ मध्ये असल्याचे निदर्शनास आले. या धरणांची पुढील दोन वर्षांत दुरुस्ती न केल्यास हे प्रकल्प कॅटेगिरी एकमध्ये जातील. यानंतर ही धरणे कधीही फुटण्याचा धोका असेल. कॅटेगिरी २ मध्ये समावेश झालेल्या या प्रकल्पांच्या भिंतीला बीळ पडले, तडे गेले, झुडपांनी वेढा दिला आहे. धरणाला ॲप्रोच रस्ता उरला नाही, सांडवा आणि पीच उखडल्याने यातील ७५ टक्के पाणीसाठा वाहून जाण्याची शक्यता आहे. आता पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती शक्य नाही.

प्रक्रियेसाठी एक वर्ष लागतेधोकदायक धरणांचा अहवाल आल्यानंतर नाशिक येथील धरण सुरक्षा संघटनेचे अभियंत्यांचे पथक कॅटेगिरी १ आणि २ मधील प्रकल्पांची तांत्रिक तपासणी करतात. दुरुस्तीसाठी कार्यकारी अभियंत्यांकडून प्रस्ताव तयार करण्यात येतो. हा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळासमोर ठेवून मंजुरी मिळविण्यात येते. नंतर शासनाकडून निधी मिळाल्यावर दुरुस्ती करण्यात येते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक वर्ष लागते.

डॅम सेफ्टी ॲक्टनुसार आता प्रत्येक धरणांचे नियमित मॉनिटरिंग होते. कॅटेगिरी २ मधील धरणांची दुरुस्ती वर्षभरात व्हावी, ही अपेक्षा असते. धरणांची दुरुस्ती न झाल्यास ही धरणे धोकादायक होतात आणि पुढे ते कॅटेगिरी १ मध्ये पोहोचतात. असे होऊ नये, याकरिता कॅटेगिरी २ मधील प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध केला जातो.- समाधान सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा.

टॅग्स :DamधरणMarathwadaमराठवाडाRainपाऊस