शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

प्रसादजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 4:16 PM

कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे’ असेच प्रसादजी चालत राहिले. त्यांचा जीवनप्रवास सांगणारे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्याला ‘पदयात्रा’ असे अन्वर्थक नाव दिले आहे.

- नरेंद्र चपळगावकर

कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे’ असेच प्रसादजी चालत राहिले. त्यांचा जीवनप्रवास सांगणारे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्याला ‘पदयात्रा’ असे अन्वर्थक नाव दिले आहे.औपचारिक पदयात्रेत तर ते अनेक वेळा सहभागी झाले; पण पदयात्रेचा आणखी एक अर्थ असा की, येतील त्यांच्याबरोबर, कोणी न आले तर एकटेच, आपल्या उद्दिष्टासाठी साधनांची वाट न पाहता मार्गक्रमण करीत राहावयाचे, या अर्थाची पदयात्रा त्यांनी आयुष्यभर चालवली आहे.

‘महात्मा गांधींच्या कल्पनेतील राज्यघटना’ या विषयावर मी काही काम करीत होतो. गांधीजींच्या मनातील स्वयंपूर्ण व स्वायत्त खेड्याची कल्पना व अशा खेड्यांना राज्याचा प्राथमिक घटक मानण्याची इच्छा घटना समितीने स्वीकारली नाही. गांधीजींना वाटते तसे खेडे आज अस्तित्वातच नाही, असे घटना समितीच्या बहुसंख्य सभासदांचे व जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही मत होते. साठ वर्षांपूर्वी घटना तयार होताना खेडी जशी होती तशीच ती आहेत की, काही बदलली आहेत, हे समजूनही घ्यावे, असा मनात विचार आला. गेली पन्नास वर्षे ज्यांनी गांधीविचारांवर अविचल श्रद्धा ठेवली व बराच काळ ग्रामस्वराज्याची कल्पना राबविण्यासाठी काम केले त्या गंगाप्रसाद अग्रवालांची आठवण होणे स्वाभाविक होते. त्यांचा परिचयही होता आणि अनेक निमित्ताने भेटीही झाल्या होत्या. त्यांना भेटावे, असे मनात आले. सतत भ्रमंती करणारे गंगाप्रसादजी वसमतला आहेत का, याची चौकशी केली, तर रमेश अंबेकरांनी सांगितले की, प्रसादजी आता फारसे वसमतबाहेर जात नाहीत. तारीख कळवली व वसमतलाच जाऊन भेटावयाचे ठरवले. 

सडपातळ अंगकाठी, बोलका चेहरा, स्वच्छ उच्चार, खादीचे शुभ्र पण इस्त्री नसलेले कपडे; वर्षानुवर्षे पाहिलेले तसेच रूप. संभाषणाला सुरुवात करताना सहज त्यांना विचारले, ‘तब्येत कशी आहे?’ ‘उत्तम आहे.’ थोडेसे विस्मरण होते आणि थोडे कमी ऐकू येते. चालताना काठीचा आधार घ्यावा लागतो. एवढ्या किरकोळ गोष्टी सोडल्या, तर तब्येत छानच आहे.’ नव्वदीत प्रवेश करीत असलेले प्रसादजी आपल्या शारीरिक दौर्बल्याला ‘किरकोळ’ विशेषण लावून आपल्या स्वत:कडेसुद्धा सकारात्मक दृष्टीने पाहत होते. जे उपलब्ध आहे त्याच्या साह्याने हातात घेतलेले काम करीत राहायचे, नाही त्याबद्दल तक्रार करावयाची नाही, हा वसा तर त्यांनी आयुष्यभर पाळला आहे. अगदी गरीब माणसाच्याही घरी ते आरामात राहू शकतात. फारशा गरजाच नसतात. आपल्या नियमांचे स्तोमही नसते.

पूर्वी गांधीवाद्यांच्या पथ्यपाण्याची थट्टा व्हायची. प्रसादजी पाहुणे आलेल्या गृहिणीला कसलाच त्रास नसतो. गाईचे तूपबीप तर सोडाच; पण कुठे तिखट कमी नसले तरी चालते. कोल्हापूर आणि परभणी हे जिल्हे तर तिखट चवीने खाणारे, प्रसादजींनी दोन्ही जिल्ह्यांत भरपूर भ्रमंती केली आहे. ज्यांच्या घरी आपण उतरलो आहोत त्यांना आपल्यासाठी कसलाही त्रास होऊ नये याबद्दल ते दक्ष असतात. स्वत:चे कपडे स्वत: धुतात; ते वाळवण्यासाठी एक दोरीही बाळगतात. स्नानासाठी त्यांना थंड-गरम कसलेही पाणी चालते. ते चहा-कॉफी घेत नाहीत. फळे दिलीच तर नाकारत नाहीत. रोज थोडे सूत काततात, त्यांच्या वस्त्रापुरते ते सूत असते.

दुसरा वसा म्हणजे सतत कार्यमग्न राहावयाचे. एक संपले म्हणजे दुसरे सार्वजनिक काम शोधावयाचे- असे आयुष्यभर त्यांनी केले. कामे कमी पडतील अशी तर शक्यताच नव्हती. जेथे कार्यकर्ते हवे होते तशी अनेक कामे त्यांना दिसत होतो. कधी जयप्रकाश-विनोबांसारखे ज्येष्ठ बोलावूनही घ्यायचे; पण तो अपवाद. प्रसादजींनी स्वत:च आपली क्षेत्रे निवडली. ‘कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे’ असेच प्रसादजी चालत राहिले. त्यांचा जीवनप्रवास सांगणारे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्याला ‘पदयात्रा’ असे अन्वर्थक नाव दिले आहे. औपचारिक पदयात्रेत तर ते अनेक वेळा सहभागी झाले; पण पदयात्रेचा आणखी एक अर्थ असा की, येतील त्यांच्याबरोबर, कोणी न आले तर एकटेच, आपल्या उद्दिष्टासाठी साधनांची वाट न पाहता मार्गक्रमण करीत राहावयाचे- या अर्थाची पदयात्रा त्यांनी आयुष्यभर चालवली आहे.

वसमत हे निजामी राज्यातले तालुक्याचे गाव. निजामी रिवाजाप्रमाणे तेथे फक्त सातवीपर्यंतची शाळा. त्यामुळे जालन्याला आठवी पदरात पाडून घेऊन १९३८ साली ते अंबाजोगाईच्या योगेश्वरीच्या योगेश्वरी नूतन विद्यालयात नववीच्या वर्गात दाखल झाले. त्यापूर्वीच वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचे लग्नही झाले होते; पण घराची जबाबदारी मात्र अद्याप वडीलच पाहत होते. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, अशी स्वातंत्र्यलढ्यातील नेतेमंडळी अंबाजोगाईतल्या या शाळेची चालकच नव्हे, तर शिक्षकही होती. अडतीस साल हे हैदराबाद संस्थानात निजामाविरुद्धच्या आंदोलनाच्या प्रारंभाचे साल. याच वर्षी स्वातंत्र्याचा संस्कार देणारे शिक्षण प्रसादजींना मिळण्याला प्रारंभ झाला. शाळेच्या वसतिगृहात बाबासाहेबांची व्याख्याने होत. ओजस्वी आणि आकर्षक वक्तृत्व आणि उत्कट देशभक्तीचे विचार यामुळे बाबासाहेब प्रसादजींप्रमाणेच सर्व विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक झाले होते. त्यावेळी मराठवाड्यात फक्त औरंगाबादला इंटरपर्यंतचे शिक्षण देणारे एक सरकारी कनिष्ठ महाविद्यालय होते. मॅट्रिक झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी ऐवीतेवी नव्या गावीच जायचे तर सरकारी कॉलेज कशाला? प्रसादजींनी स्वाभाविकपणे वर्धा निवडले. जवळच असलेल्या सेवाग्राममध्ये  गांधीजी अधूनमधून असत. प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत श्रीमन्नारायण अग्रवाल तेथल्या कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य होते. प्रसादजींनी त्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. दुसऱ्या वर्षी नागपूरच्या सिटी बिंझाणी महाविद्यालयात पहिले वर्ष पार पडले. नंतर बेचाळीसची चळवळ सुरू झाली. सर्वकाही सोडून प्रसादजी सरळ गावी परतले. 

स्वातंत्र्यानंतर निवडणुकीत भाग घ्यावयाचा नाही, असे ठरवलेल्या प्रसादजींना आपला निश्चय मोडण्याची लोकांनी पाळी आणली. १९५३ साली मराठवाड्यात नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यासाठी एक नागरी आघाडी प्रसादजींनी तयार केली. लोकांच्या दडपणामुळे ते स्वत:ही एका वॉर्डातून उभे राहिले. १५ जागांपैकी प्रसादजींच्या आघाडीला १४ मिळाल्या आणि नवनिर्वाचित सभासदांनी गंगाप्रसादजींना नगराध्यक्ष केले. राजकारण मध्ये न आणता उपलब्ध साधनसामग्रीत लोकांना जास्तीत जास्त नागरी सोयी कशा उपलब्ध करून देता येऊ शकतील, याचा प्रयत्न करण्याचा एक वस्तुपाठच प्रसादजींनी वसमतमध्ये दाखवला. नगरपालिकेचा कारभार ठीक चालला असतानाच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. प्रसादजींनी आपल्या अध्यक्षपदाचा आणि नगरपालिकेच्या सभासदत्वाचा राजीनामा देऊन टाकला. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा हा पुरस्कारही होता आणि सत्तेच्या राजकारणातून प्रसादजींची ही मुक्तीही होती.  

(‘लोकमत’च्या २०१२ च्या दिवाळी अंकातील लेखाचा संपादित अंश)

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यूMarathwadaमराठवाडा