पत्नीपाठोपाठ पतीनेही सोडले प्राण
By Admin | Updated: November 23, 2014 00:25 IST2014-11-22T23:41:24+5:302014-11-23T00:25:59+5:30
माजलगाव : पत्नीने रागाच्या भरात पेटवून घेतल्यावर तिला वाचवायला गेलेला पतीही भाजला होता़ त्या दोघांचाही मृत्यू झाला़ ही हृदयद्रावक घटना शनिवारी माळेवाडी येथे उघडकीस आली़

पत्नीपाठोपाठ पतीनेही सोडले प्राण
माजलगाव : पत्नीने रागाच्या भरात पेटवून घेतल्यावर तिला वाचवायला गेलेला पतीही भाजला होता़ त्या दोघांचाही मृत्यू झाला़ ही हृदयद्रावक घटना शनिवारी माळेवाडी येथे उघडकीस आली़
सोनी अनिल ठगे (वय २४), अनिल उत्तम ठगे (वय २८ रा़ माळेवाडी) अशी मयतांची नावे आहेत़ ते शेतीव्यवसाय करुन उदरनिर्वाह करत होते़ पती अनिल याला दारुचे व्यसन होते़ त्यामुळे सोनी यांनी ८ नोव्हेंबर रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले़ तिला वाचविण्याच्या नादात अनिल देखील भाजला होता़ उपचार सुरु असताना १६ नोव्हेंबर रोजी सोनी यांचा मृत्यू झाला़ त्यानंतर पती अनिल याची मृत्यूशी झुंज सुुरु होती़ मात्र, २० नोव्हेंबर रोजी त्यानेही अखेरचा श्वास घेतला़ विश्वनाथ आगलावे यांच्या खबरीवरुन ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे़ तपास सहायक निरीक्षक शरद जऱ्हाट करत आहेत़ (वार्ताहर)