विहिरीत पडलेल्या बालिकेचे वाचविले प्राण

By Admin | Updated: September 11, 2014 00:02 IST2014-09-10T23:46:41+5:302014-09-11T00:02:20+5:30

पूर्णा : शहरातील पूर्णा-नांदेड रस्त्यावरील महामाई मंदिराजवळ सात वर्षीय चिमुकली पाणी आणण्यासाठी गेली होती़ पाणी शेंदत असताना तोल जावून विहिरीत पडली़

Pran survived the baby lying in the well | विहिरीत पडलेल्या बालिकेचे वाचविले प्राण

विहिरीत पडलेल्या बालिकेचे वाचविले प्राण

पूर्णा : शहरातील पूर्णा-नांदेड रस्त्यावरील महामाई मंदिराजवळ सात वर्षीय चिमुकली पाणी आणण्यासाठी गेली होती़ पाणी शेंदत असताना तोल जावून विहिरीत पडली़ त्या ठिकाणी देवदर्शनासाठी आलेल्या शहरातील मुन्ना राठोड व शिवराज बिंदेकर या दोघांनी विहिरीत उडी घेऊन चिमुकलीचे प्राण वाचविले़
सोलापूर जिल्ह्यातील बाबर परिवार मंदिर परिसरात बिऱ्हाड घेऊन वास्तव्यास आहे़ या ठिकाणी बाबर परिवारातील महिलेने आपली मुलगी पूजाला पाणी आणण्यासाठी पाठविले होते़
संसाराचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन लहान-सहान व्यवसाय करणाऱ्या बाबर परिवारातील मुलगी पाणी शेंदताना विहिरीत पडली़ या ठिकाणी देव दर्शनासाठी आलेल्या मुन्ना राठोड व शिवराज बिंदेकर या दोघांनी विहिरीत उडी घेऊन सदर मुलीचे प्राण वाचविले़
त्यानंतर त्या ठिकाणी जमाव गोळा झाला व मुलीचे प्राण वाचविल्याबद्दल जमलेल्या लोकांनी कौतुक केले़ यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Pran survived the baby lying in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.