शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

प्रदीप जैस्वाल यांना पत्नीशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 1:04 AM

माजी आमदार तथा शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्या पत्नी सरोज जैस्वाल (४८) यांचे सोमवारी सायंकाळी ५.३० वा. निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : माजी आमदार तथा शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्या पत्नी सरोज जैस्वाल (४८) यांचे सोमवारी सायंकाळी ५.३० वा. निधन झाले. मागील दोन वर्षांपासून त्या आजारी होत्या. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची सोमवारी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती प्रदीप जैस्वाल, मुले निखिलेश, ऋषिकेश, सून दीपाली जैस्वाल तसेच दीर अशोक जैस्वाल, दिलीप जैस्वाल, मनोज जैस्वाल, संतोष जैस्वाल असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता शिवसेनेसह सर्वच राजकीय, सामाजिक विश्वात वा-यासारखी पसरली. जैस्वाल यांच्या समर्थनगर येथील निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.सरोज यांचे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे माहेर असून, त्यांच्यासह दोन बहिणी व तीन भावंडांसह आई-वडिलांसोबत त्या वाढल्या. २३ जून १९८८ साली त्यांचा विवाह प्रदीप जैस्वाल यांच्याशी झाला. जैस्वाल यांच्या राजकीय कारकीर्दीत त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहिल्या. राजकारणाच्या चढ-उतारात जैस्वाल यांना अनेकदा संघर्ष करावा लागला. त्या संघर्षात जैस्वाल यांना पत्नी सरोज यांनी मोलाची साथ दिली. १९८८ ते १९९९ हा जैस्वाल यांचा राजकीय प्रवास उंचावणारा कालखंड होता. १९९९ ते २००९ या दहा वर्षांत जैस्वाल यांनी अनेक चढ-उतार पाहिले. या काळात सरोज या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. २००९ ला जैस्वाल अपक्ष विजयी होण्यात पत्नी सरोज यांची प्रचंड मोलाची मदत राहिली. जैस्वाल राजकारणात अहारोत्र सक्रिय असताना सरोज यांनी मात्र कुटुंबाला सर्वाधिक वेळ दिला. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जैस्वाल यांचा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली.आज अंत्यसंस्कार होणारमंगळवार, २३ जानेवारी रोजी सकाळी १० वा. सरोज जैस्वाल यांची अंत्ययात्रा शाकुंतल निवास, निराला बाजार, समर्थनगर येथून निघेल. कैलासनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.