प्रगणकांना मानधन मिळेना

By Admin | Updated: June 29, 2014 00:23 IST2014-06-29T00:20:44+5:302014-06-29T00:23:38+5:30

हिंगोली : जनगणनेचे काम करणाऱ्या हिंगोली तालुक्यातील प्रगणक, पर्यवेक्षक, मास्टर ट्रेनर यांना मानधनासाठी २ लाख २६ हजार २५० रुपयांचा निधी उपलब्ध करून देवूनही तहसील

Pradakkars get recognition | प्रगणकांना मानधन मिळेना

प्रगणकांना मानधन मिळेना

हिंगोली : जनगणनेचे काम करणाऱ्या हिंगोली तालुक्यातील प्रगणक, पर्यवेक्षक, मास्टर ट्रेनर यांना मानधनासाठी २ लाख २६ हजार २५० रुपयांचा निधी उपलब्ध करून देवूनही तहसील कार्यालयाकडून या निधीचे वितरण करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची प्रगणकांची तक्रार आहे.
जिल्हाभरात गतवर्षी जनगणनेचे काम प्रगणक, पर्यवेक्षक, मास्टर ट्रेनर यांच्यामार्फत करण्यात आले होते. हे काम केलेल्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसाठी १३ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला. त्यामध्ये हिंगोली तालुक्यासाठी २ लाख २६ हजार २५० रुपये, कळमनुरीसाठी २ लाख ६६ हजार, सेनगावसाठी २ लाख ६८ हजार २५० रुपये, वसमतसाठी ३ लाख ७ हजार २५० रुपये, औंढा नागनाथ तालुक्यासाठी २ लाख ३६ हजार रूपये, हिंगोली शहरासाठी ७ हजार २५० रुपये, कळमनुरी शहरासाठी ११ हजार रूपये आणि वसमत शहरासाठी २१ हजार ५०० रुपयांचा समावेश होता. यामधील हिंगोली वगळता बहुतांश ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात आले; परंतु हिंगोलीतील कर्मचाऱ्यांना मानधन देण्यासाठी निधी उपलब्ध करून देवूनही गेल्या वर्षभरापासून तो वितरीत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे याची चौकशी करून संबंधितांना त्वरीत मानधन देण्याची मागणी होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Pradakkars get recognition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.