पं.स. अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
By Admin | Updated: June 21, 2015 00:24 IST2015-06-21T00:24:12+5:302015-06-21T00:24:12+5:30
लातूर : चाकूर पंचायत समिती अंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी पत्रे खरेदीत ७ लाख रूपयांचा अपहार करण्यात आला होता़

पं.स. अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
लातूर : चाकूर पंचायत समिती अंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी पत्रे खरेदीत ७ लाख रूपयांचा अपहार करण्यात आला होता़ पत्रे खरेदी गैरव्यवहाराशी संबंधीत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत , त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत विरोधीपक्ष नेते रामचंद्र तिरुके , रामराव बुदरे, राजकुमार पाटील, भरत गोरे यांनी केली़
चाकूर पंचायत समितीमधील शासकीय योजनेतील ई-निविदा प्रक्रियेत अटी व शर्तीचा बदल करून चढ्याभावाने निविदा स्विकारून पत्रे खरेदीमध्ये ७ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मेघमाळे यानी १० जून रोजी चाकूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधीत पंचायत समितीच्या विद्यमान गटविकास अधिकारी , तत्कालीन गटविकास अधिकारी, माजी सभापती,
संबंधीत ठेकेदारासह ११ जणांवर
गुन्हे दाखल करण्यात आले होते़ संबंधीत गुन्हे दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली़
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने मातांसाठी व बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहारातही अपहार व निकृष्ठ दर्जाचा आहार दिला जात असून त्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली़ (प्रतिनिधी)