विजेच्या लपंडावाने राजूरकर त्रस्त...!
By Admin | Updated: November 2, 2015 00:15 IST2015-11-02T00:05:03+5:302015-11-02T00:15:04+5:30
राजूर : अवास्तव भारनियमन व सततच्या विजेच्या लपंडावाने राजूर येथील ग्रामस्थ, व्यापारी त्रस्त झाले असून, येथे सिंंगल फेज यंत्रणा कार्यान्वित करून कायमस्वरूपी विजपुरवठा करण्यात यावा,

विजेच्या लपंडावाने राजूरकर त्रस्त...!
राजूर : अवास्तव भारनियमन व सततच्या विजेच्या लपंडावाने राजूर येथील ग्रामस्थ, व्यापारी त्रस्त झाले असून, येथे सिंंगल फेज यंत्रणा कार्यान्वित करून कायमस्वरूपी विजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बळीराम पुंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, राजूर हे प्रसिध्द तिर्थक्षेत्र असून, येथे कायम भाविकांची राजूरेश्वराच्या दर्शनासाठी नेहमी वर्दळ असते. गेल्या महिनाभरापासून येथे सतत विजेचा लपंडाव होत असल्याने भाविकांसह जनता त्रस्त झाली आहे. महावितरण कार्यालयात वीज पुरवठ्याबाबत विचारणा केली असता कायम भारनियमन असल्याचे सांगितले जात आहे. राजूरात मोठी बाजारपेठ असून सततच्या विजेच्या लपंडावाने व्यापारी हैराण झाले आहेत. तसेच सध्या डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून, वीज गायब रहात असल्याने त्याचा सामान्य नागरिकांना त्रास होत आहे.
येथे कायमस्वरूपी सुरळीत विजपुरवठ्यासाठी सिंंगलफेज यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी बळीराम पुंगळे यांनी निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)