सातारा येथे वीजपुरवठा गुल; नागरिक अंधारात
By Admin | Updated: October 6, 2014 00:43 IST2014-10-06T00:23:08+5:302014-10-06T00:43:04+5:30
औरंगाबाद : सातारा गावात वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचा बिघाड रात्री उशिरापर्यंतही दुरुस्त झाला नसल्याने नागरिकांना सणासुदीच्या पूर्वसंध्येला अंधारात राहावे लागले.

सातारा येथे वीजपुरवठा गुल; नागरिक अंधारात
औरंगाबाद : सातारा गावात वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचा बिघाड रात्री उशिरापर्यंतही दुरुस्त झाला नसल्याने नागरिकांना सणासुदीच्या पूर्वसंध्येला अंधारात राहावे लागले. ११ केव्हीच्या वाहिनीवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला असल्याने दुपारपासून तारेवरची कसरत करूनही रात्री उशिरापर्यंत वीज सुरळीत झाली नव्हती.
जीटीएलच्या अधिकाऱ्यांना कळवूनही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे, असे सांगून अन् कार्यालयाचा फोन ‘बिझी टोन’मध्ये टाकून कर्मचारी बिनधास्त झाले. जनतेची मात्र झोप उडाली. ऐन सणासुदीच्या पूर्वसंध्येला आणि प्रचाराच्या रणधुमाळीत जीटीएलच्या वेळकाढूपणामुळे अंधारात राहावे लागले. परीक्षेचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांना कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भीती पालक व विद्यार्थ्यांतून व्यक्त करण्यात आली.
दुपारी पैठण रोडवरील मॉल व नक्षत्रवाडी परिसरात ११ केव्हीच्या वाहिनीवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
नागरिकांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांना सतत संपर्क साधूनही फायदा झालेला नव्हता. सणासुदीच्या काळात अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे माजी सरपंच फिरोज पटेल यांनी सांगितले.
जनसंपर्कही बंदच
अधिकारी व कर्मचाऱ्यांना फ्यूज कॉल सेंटरवर दूरध्वनीवर संपर्क साधून फोन उचलत नसल्याचे नागरिक वैतागले असून, गावातील ट्रान्सफॉर्मरही बिघडल्याची
तक्रार आहे, असे सोमीनाथ शिराणे म्हणाले.