वीजपुरवठा खंडित; आज पाणीपुरवठा विस्कळीत
By Admin | Updated: November 16, 2014 00:39 IST2014-11-16T00:15:34+5:302014-11-16T00:39:02+5:30
औरंगाबाद : जीटीएलने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे अर्ध्याअधिक शहरात १२ तासांहून काळासाठी वीज गुल झाली होती.

वीजपुरवठा खंडित; आज पाणीपुरवठा विस्कळीत
औरंगाबाद : जीटीएलने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे अर्ध्याअधिक शहरात १२ तासांहून काळासाठी वीज गुल झाली होती. याचा फटका बसल्याने रविवारी (दि.१६) शहरातील अनेक भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
शुक्रवारी (दि.१४) रात्री अर्धे शहर अंधारात होते. पाणीपुरवठा करणाऱ्या नक्षत्रवाडी व फारोळा पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी तब्बल १२ तास कोरडीठाक पडली होती. त्यामुळे शहरातील जलकुंभांना पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. शनिवारी सकाळी महावितरणला सांगून या दोन्ही पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे रविवारी शहराला पुरेसा पाणीपुरवठा होणार नाहीे.