शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पॉवर ऑफ सायलेन्स! छत्रपती संभाजीनगरात जप्त सायलेन्सरमधून पोलिसांनी उभारले 'स्पेस रॉकेट'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 19:13 IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या अभिनव उपक्रमातून ‘स्पेस रॉकेट’चं अनावरण

छत्रपती संभाजीनगर: शहरातील युवकांमध्ये गोंगाट निर्माण करणाऱ्या कर्णकर्कश आवाजाच्या दुचाकींच्या सायलेन्सरवर पोलिसांनी कारवाई करत एक अभिनव उपक्रम राबविला आहे. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच महिन्यांत सुमारे ३०० सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. या जप्त सायलेन्सरचा पुनर्वापर करत आकर्षक आणि कलात्मक ‘स्पेस रॉकेट’ तयार करण्यात आलं आहे.

नुकतेच क्रांती चौकातील सौंदर्य बेटावर या स्पेस रॉकेटचे लोकार्पण पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मनपा प्रशासक जी. श्रीकांत, उपायुक्त बगाटे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक विकास जैन आणि उद्योजक सुनील किर्दक आदी मान्यवर उपस्थित होते.

उपायुक्त नितीन बगाटे यांनी यावेळी सांगितले की, "साउंड पोल्युशनमुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे ही मोहिम हाती घेण्यात आली. जप्त सायलेन्सर केवळ स्क्रॅपमध्ये न टाकता, त्यांचा पुनर्वापर करून जनजागृती करण्याचा आमचा उद्देश होता."

हे स्पेस रॉकेट उद्योजक सुनील किर्दक यांच्या कंपनीत तयार करण्यात आले असून, त्याचा उपयोग नागरिकांमध्ये साउंड पोल्युशनविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे. या अभिनव उपक्रमामुळे पोलिस प्रशासनाच्या जनसंपर्कात वाढ झाली असून, युवकांमध्येही याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस