शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

उच्च शिक्षित शेतकऱ्याच्या नियोजनाने केऱ्हाळ्यात होतेय पोल्ट्री, शेळीपालन हब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:17 IST

यशकथा :संजय चुंगडे या शेतकऱ्याने उत्कृष्ट नियोजनाने पोल्ट्री व शेळीपालन व्यवसायात आर्थिक प्रगती साधली.

- कैलास पांढरे, (केऱ्हाळा, जि.औरंगाबाद)

सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील उच्चशिक्षित संजय चुंगडे या शेतकऱ्याने उत्कृष्ट नियोजनाने पोल्ट्री व शेळीपालन व्यवसायात आर्थिक प्रगती साधली. संजयने इतरांनाही याबाबत मार्गदर्शन केल्याने या गावातील सुमारे पंचवीस जणांनी याचे अनुकरण केले आहे. यामुळे हे गाव आता पोल्ट्री व शेळीपालन हब होऊ पाहत आहे. या माध्यमातून दुष्काळातही चांगली आर्थिक प्रगती गावातील तरुण शेतकरी साधत आहेत.

उच्चशिक्षित तरुण शेतकरी संजय देवसिंग चुंगडे या युवकाकडे केऱ्हाळा परिसरात तीन एकर शेती आहे. संजय यांनी गेल्या काही वर्षांपासून शेतीत वेगवेगळे प्रयोग केले. परंतु निसर्गाच्या अवकृपेने अनेक प्रयोग अयशस्वी ठरले. त्यानंतर घरची हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी संजयने शेतीलापूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीला कुक्कुटपालन करण्याचे ठरविले. आर्थिक गणित जुळत नसल्याने त्यांनी शक्कल लढवून कमी खर्चात बांबू, पऱ्हाटी, उसाची पाचट, यासारख्या टाकाऊ वस्तंूपासून २५ बाय ४० चे शेड तयार केले. त्यात कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू केला. बांबू, पऱ्हाटीच्या शेडमध्ये संजयला सुरुवातीच्या एका वर्षातच लाखो रुपयांचा नफा मिळाला.

या  उत्पन्नाच्या जोरावर संजयने पुन्हा नवीन दोन हजार पक्ष्यांच्या क्षमतेचे ८० बाय २५ बांधकाम करून नवीन शेड तयार केले. त्यात पुन्हा पंधराशे पक्ष्यांचा व्यवसाय सुरू केला. जुन्या व नव्या या दोन्ही शेडमधून वर्षाकाठी खर्च वगळता तीन ते चार लाख रुपयांची बचत झाली. बचतीचा चांगला मार्ग मिळाल्याने संजयची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. यानंतर कुक्कुटपालनासोबतच त्याने शेळीपालन व्यवसाय सुरू केला.

संजयने आज ६ हजार कोंबड्या व २५० शेळी पालनासाठी पुरेल एवढ्या मजबूत शेडची निर्मिती केली आहे. गिरिराज, वनराज, ग्रामप्रिया, डी.पी.क्रास पाथर्डी, कडकनाथ व बॉयलर यासारख्या पक्ष्यांची कुक्कुटपालनासाठी त्याने निवड केली आहे. ही निवड सर्व अभ्यासांती केली आहे. यासाठी त्याने सर्व बाजारांचा अभ्यास केला. यात सर्वात जास्त कोणत्या कोंबडीला मागणी आहे. हे पाहून निवड केली. याच पद्धतीने त्याने शेळ्यांचीही निवड केली.

गिरिराज या जातीच्या कोंबड्यांपासून मागील वर्षी दररोज ५०० अंडी विकायचा. या माध्यमातून संजय दररोज दोन ते अडीच हजार रुपये नफा मिळवीत होता. शेळीपालनात सोजात, शिरोई व गावरान या विविध जातीचे पालन संजय या दोन्ही शेतीपूरक व्यवसायाचे गावातील वीस ते पंचवीस शेतकऱ्यांना नि:शुल्क प्रशिक्षणाचे धडे देत आहे. यामुळे गावातील बेरोजगार सुमारे २५ तरुण शेतकऱ्यांनी याचा आदर्श घेऊन या व्यवसायातून लाखो रुपये नफा कमावला आहे. गावात प्रतिमहिन्याला १८ ते २० हजार कोंबड्यांची तर चार ते पाच महिन्याला ६०० ते ७०० बोकडांची विक्रमी विक्री होत असून, हे गाव कुक्कुट व शेळीपालन हब झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी