नगरविकासमंत्र्यांकडून त्या कामांना स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:06 IST2021-07-14T04:06:37+5:302021-07-14T04:06:37+5:30
गंगापूरचे उपनगराध्यक्षा, गटनेता, उपशहर प्रमुख, स्वच्छता सभापती आणि उपजिल्हाप्रमुख असलेल्या शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील कामांना नुकतीच स्थगिती देण्यात आली आहे. ...

नगरविकासमंत्र्यांकडून त्या कामांना स्थगिती
गंगापूरचे उपनगराध्यक्षा, गटनेता, उपशहर प्रमुख, स्वच्छता सभापती आणि उपजिल्हाप्रमुख असलेल्या शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील कामांना नुकतीच स्थगिती देण्यात आली आहे. अनुक्रमे १ कोटी ७ लाख, ८० लाख १७ हजार आणि २२ लाख ७ हजार अशा एकूण २ कोटी १२ लाखांच्या कामांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश नगरविकासमंत्र्यांनी दिले आहे. साधारण दीड महिन्यापूर्वी विविध वॉर्डात रस्त्याचे कामे सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत किमान ५० टक्के कामे पूर्ण झाली असल्याचे चित्र आहे. परंतु, तक्ररीच्या आनुषंगाने शिवसेनेच्याच नगरविकासमंत्र्यांनी शिवसेनेच्या वॉर्डातील संबंधित कामांना स्थगिती दिल्याने तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी दाखल तक्रारीच्या चौकशीत पोलिसांना काही निष्पन्न न झाल्याचा अहवाल दिला असून, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पण रिट याचिका खारीज केली आहे. मात्र नगरविकास मंत्र्यांनी संबंधित कामांना स्थगिती देत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.