बँकेची निवडणूक पुढे ढकलली
By Admin | Updated: February 6, 2017 23:48 IST2017-02-06T23:45:43+5:302017-02-06T23:48:45+5:30
जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक मंडळासाठी होणारी निवडणूक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे दोन महिने पुढे ढकलण्यात आली

बँकेची निवडणूक पुढे ढकलली
जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक मंडळासाठी होणारी निवडणूक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे दोन महिने पुढे ढकलण्यात आली. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने शनिवारी हा आदेश काढला. राज्यातील स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्थांची निवडणूक एकाच कालावधीत होत आहे. त्यामुळे प्रशासन व सभासदांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन वरील निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम एकाच वेळी होत असल्याने अ तसेच ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत न्यायालयाने निश्चित आदेश दिले आहेत. अशा संस्था वगळून अ व ब वर्गातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम ज्या टप्प्यापर्यंत पूर्ण झाला आहे, तेव्हापासून या आदेशाच्या तारखेपासून दोन महिने पुढे ढकलण्यात आली.