‘पोस्टींग’ रायमोहाला अन् काम जिल्हा रुग्णालयात
By Admin | Updated: March 29, 2016 00:48 IST2016-03-29T00:20:19+5:302016-03-29T00:48:40+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड वैद्यकीय बील काढून देण्यासाठी ३७ हजार रूपयाची लाच घेताना जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठांच्या मर्जीतला लिपिक अब्दुल हाफिज खान रहिम खान याला

‘पोस्टींग’ रायमोहाला अन् काम जिल्हा रुग्णालयात
व्यंकटेश वैष्णव , बीड
वैद्यकीय बील काढून देण्यासाठी ३७ हजार रूपयाची लाच घेताना जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठांच्या मर्जीतला लिपिक अब्दुल हाफिज खान रहिम खान याला रंगेहात पकडल्याने जिल्हा रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे या लिपिकाची पोस्टींग दोन वर्षापासून शिरूर कासार तालुक्यातील रायमोह येथील ग्रामीण रुग्णालयात आहे, परंतु वरिष्ठांच्या मर्जीने संबंधित लिपिकाने दोन वर्षात एक दिवसही रायमोहा येथे काम केले नसल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय देयकासाठी नागरिक चकरा मारूनही देयके दिली जात नव्हती. याबाबत मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात तक्रारी असताना देखील हाफिज याच्यावर कारवाई झालेली नाही. शेवटी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लिपिक हाफिज याला रंगेहात पकडल्याने जिल्हा रुग्णालयातील कृष्णकृत्य समोर आले आहे.
आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय देयके मिळविण्यासाठी पैसे मागितले जातात, अशी दबक्या आवाजात चर्चा होत होती. मात्र सोमवारी हाफिज याला रंगेहात पकडल्या नंतर आता पर्यंत ज्या-ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना वाईट अनुभव आला होता, ते अधिकारी जिल्हा रुग्णालयातील एक उच्च पदस्थ अधिकारी व लिपिक हाफिज याच्या विरूध्द तक्रारी देण्यासाठी पुढे येत आहेत. एवढेच नाही तर २०१५ मध्ये जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी देखील जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय बिलांबाबत अर्थिक व्यवहार होत असल्यावरून चौकशी केली होती. मात्र चौकशीत काही हाती लागले नव्हते.