मनपा अधिकाऱ्यांना पदस्थापना
By Admin | Updated: July 8, 2017 00:28 IST2017-07-08T00:27:04+5:302017-07-08T00:28:43+5:30
नांदेड : महापालिकेतील अधिकाऱ्यांना नव्याने पदस्थापना दिल्या असून उपायुक्तांना खातेवाटप करण्यात आले आहेत़ सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्याकडे शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली

मनपा अधिकाऱ्यांना पदस्थापना
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेतील अधिकाऱ्यांना नव्याने पदस्थापना दिल्या असून उपायुक्तांना खातेवाटप करण्यात आले आहेत़ सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्याकडे शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली असून वादग्रस्त ठरलेल्या सहायक आयुक्त संजय जाधव यांना तरोडा क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे़
शहरातील अस्वच्छतेला कारणीभूत ठरलेल्या सहायक आयुक्त संजय जाधव यांना स्थायी समितीने सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव मंजूर केला होता़ शहर स्वच्छतेच्या बाबतील अपयश आल्याने व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने सर्व सदस्यांच्या संतापाला संजय जाधव कारणीभूत ठरले होते़
सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्याकडे तरोडा क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी होती़ गुलाम सादेक यांनी तरोडा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सर्वाधिक कर वसुली व स्वच्छतेची कामे केली़ त्यामुळे आता त्यांच्यावर शहराच्या स्वच्छता विभागाची जबाबदारी सोपविली आहे़ तसेच उपायुक्त संतोष कंदेवार यांच्याकडे निवडणूक विभाग, उद्यान, स्टेडियम, आपत्ती व्यवस्थापन, विधि, शिक्षण, क्रीडा पशुसंवर्धन तर उपायुक्त संभाजी वाघमारे यांच्या सामान्य प्रशासन, आस्थापना, कर, स्थानिक संस्था कर, नगररचना, उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्याकडे अमृत योजना, बीएसयुपी, पीएमएवाय, पाणीपुरवठा, बांधकाम, भूसंपादन, जनगणना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे विषय सोपविले आहेत़