महेमूद दरवाज्यावर पोस्टरबाजी
By | Updated: December 3, 2020 04:11 IST2020-12-03T04:11:50+5:302020-12-03T04:11:50+5:30
औरंगाबाद : पाणचक्कीजवळील ऐतिहासिक महेमूद दरवाज्यावर गेल्या महिनाभरापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहे. हिस्ट्री सोसायटीकडून या प्रकाराबद्दल ...

महेमूद दरवाज्यावर पोस्टरबाजी
औरंगाबाद : पाणचक्कीजवळील ऐतिहासिक महेमूद दरवाज्यावर गेल्या महिनाभरापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहे. हिस्ट्री सोसायटीकडून या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली असून, हे बॅनर मनपाकडून हटवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
विभागीय सेवा प्रवेशोत्तर परीक्षा ढकलली पुढे
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी विभागीय सेवा प्रवेशोत्तर परीक्षा ढकलली पुढे आली आहे. २१ ते २३ एप्रिल दरम्यान या परीक्षेचे नियोजन करण्यता आले होते; परंतु परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे
आरटीईची तिसरी फेरी संपली
औरंगाबाद : आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांसाठी असलेल्या आरटीई कोट्यातील प्रवेशाची तिसरी फेरी ३० नोव्हेंबरला पूर्ण झाली. आता प्रवेश पडताळणीसाठी प्रवेश समितीला ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
मुख्याध्यापकांसाठी मिपातर्फे ऑनलाईन कोर्स
औरंगाबाद : महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद (मिपा) ने मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी व शैक्षणिक प्रशासकांसाठी ३० तासांचा अभ्यासक्रम कोर्स भाषांतरित केला आहे. दिल्लीच्या निमा संस्थेने बनवलेला ऑनलाईन प्रोग्राम ऑन स्कूल लीडरशिप ॲण्ड मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम दर आठवड्याला तीन तास याप्रमाणे दहा आठवड्यांत मुख्याध्यापक व भावी मुख्याध्यापकांना पूर्ण करावा लागणार आहे. गुरुवारी दुपारी ११ ते १२ दरम्यान या अभ्यासक्रमाचे उद्घाटन होणार असल्याचे संचालक डाॅ. नेहा बेलसरे यांनी कळवले आहे.