डाकघरास आली अवकळा़़!
By Admin | Updated: December 18, 2014 00:37 IST2014-12-18T00:32:03+5:302014-12-18T00:37:33+5:30
श्रीपाद सिमंतकर , उदगीर उदगीरच्या मुख्य डाकघरास चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असून इमारत आता संपूर्णत: मोडकळीस आली आहे़ नवीन इमारतीसाठी प्रस्ताव पाठवूनही तो अद्याप लटकलेलाच आहे़

डाकघरास आली अवकळा़़!
श्रीपाद सिमंतकर , उदगीर
उदगीरच्या मुख्य डाकघरास चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असून इमारत आता संपूर्णत: मोडकळीस आली आहे़ नवीन इमारतीसाठी प्रस्ताव पाठवूनही तो अद्याप लटकलेलाच आहे़
तब्बल चाळीस वर्षापुर्वी उदगीरच्या नांदेड-बीदर रस्त्यावर मुख्य डाकघराची इमारत उभारण्यात आली होती़ आजघडीला ही इमारत डबघाईला आली आहे़ या इमारतीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी झाली असून धोकादायक इमारत असा अहवाल पाठविल्यानंतरही नव्या इमारतीचे काम हाती घेण्यात आले नाही़ उदगीर कार्यालयाच्या सोबतच माजलगाव डाकघर इमारतीचाही रिपोर्ट पाठविण्यात आला होता़ माजलगाव येथील इमारतीचे काम सुरु झाले असून उदगीर इमारत मात्र अजुनही भाग्य उजळण्याची वाट पहात आहे़
आॅनलाईन कार्यपध्दती व कोअर सिस्टिम सुरु करण्यासाठी डिश व यंत्रणा बसवितांनाही इमारतीची अवस्था पाहून बसविणे शक्य नसल्याचे निदर्शनास आले़ उस्मानाबाद येथील डाकघर अधीक्षक के़ एस़ तेलकर यांनी या कार्यालयास भेट देवून पाहणीही केली होती़ सदरील बाब गंभीर असून त्वरीत यावर कार्यवाही करण्याची नोंदही तेलकर यांनी केली होती़
परंतू औरंगाबाद व मुंबई डाक मुख्यालयांच्या मान्यतेविना प्रस्ताव अडकला आहे़ मुख्य डाकघर उदगीरचे उत्पन्न व कार्य चांगले असून दैनंदिन कामकाजासाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते़ मात्र मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे डाक कार्यालयात जाण्याची भिती नागरिकांना वाटत आहे़ ४
उस्मानाबाद डाकघर अधिक्षक के़ एस़ तेलकर यांनी पाहणी केली असून कार्यालयाचा रिपोर्ट मंजुरीसाठी पाठविला आहे़ उदगीर सोबत माजलगावचाही रिपोर्ट गेला होता़ माजलगावच्या कामास सुरुवात झाली असून उदगीरचेही सुरु होण्याची वाट पाहत आहोत़ विविध योजनांची या डाकघरात ७० हजार खाती असून उत्त्पन्नही चांगले आहे, असे येथील पोस्ट मास्तर एस़व्हीक़दम यांनी सांगितले़
४मी स्वत: पाहणी केली असून औरंगाबाद व मुंबई मुख्य डाकघर येथील परवानगी मिळताच काम सुरु केले जाईल़ उदगीर मुख्य डाकघर इमारतीचे काम करणे अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी योग्य तो पाठपुरावा वरिष्ठांकडे केला जात आहे, असे डाकघर अधीक्षक के़एस़तेलकर म्हणाले़