पोस्टाची नव्हे चूक उमेदवारांचीच
By Admin | Updated: May 13, 2014 01:00 IST2014-05-13T00:18:22+5:302014-05-13T01:00:47+5:30
औरंगाबाद : परीक्षार्थींना अचूक पत्ता न देता अनेकांना परीक्षेपासून वंचित ठेवणार्या पोस्ट खात्याच्या अधिकार्यांनी आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला.

पोस्टाची नव्हे चूक उमेदवारांचीच
औरंगाबाद : पोस्ट खात्याची परीक्षा देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थींना अचूक पत्ता न देता अनेकांना परीक्षेपासून वंचित ठेवणार्या पोस्ट खात्याच्या अधिकार्यांनी आज आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. परीक्षेची जबाबदारी सीएमसी संस्थेची असून पोस्ट खात्याची नव्हती, असा दावाही त्यांनी केला. ११ मे रोजी पोस्टल असिस्टंट पदासाठी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी उमेदवारांच्या हॉल तिकीटवर देण्यात आलेल्या अपूर्ण, चुकीच्या पत्त्यामुळे त्यांची खूप धावपळ झाली. पोस्टल सर्व्हिसेसचे डायरेक्टर आर.पी. गुप्ता यांनी या प्रकाराची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परीक्षा घेण्याची जबाबदारी ही सीएमसी लि. या संस्थेस देण्यात आली होती. आॅनलाईन अर्जाची प्रक्रिया, केंद्र, हॉल तिकीट, प्रश्नपत्रिका तयार करणे आणि पुढील सर्व जबाबदारी या संस्थेची होती. यामध्ये पोस्ट खात्याकडे कोणतीही जबाबदारी नव्हती. तरीही परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी पोस्टाकडून निरीक्षक पाठविण्यात आले होते. पत्ता, पिन कोड असतानाही काही परीक्षार्थी औरंगाबादला आले. इतरांनी मात्र, बरोबर आपापल्या केंद्रावर परीक्षा दिली. असा हा अजब पत्ता उमेदवारांच्या संख्येमुळे जालना आणि फुलंब्री हे केंद्रही देण्यात आले होते; परंतु यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. उमेदवारांच्या हॉल तिकीटवर परीक्षा केंद्राचा पत्ता ‘सरस्वती भुवन हायस्कूल, टाऊन हॉल, कचेरी रोड, जुना जालना, औरंगाबाद असा दिला होता. त्यामुळे उमेदवार औरंगाबादला आले होते. उमेदवारांनी चौकशी केल्यावर त्यांना आपले केंद्र जालना असल्याचे समजले. त्यामुळे अनेकांना परीक्षा देता आली नाही. परीक्षार्थींनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे टपाल खात्याच्या अधिकार्यांनी तोडगा काढला आणि उमेदवारांना परीक्षा देण्याची परवानगी दिली; परंतु तोपर्यंत अनेक जण नाराजी व्यक्त करीत माघारी फिरले होते.