कन्नड तालुक्यातील ५२८ शिक्षकांच्या कार्योत्तर परीक्षा परवानगी यादी निकाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:05 IST2021-05-28T04:05:42+5:302021-05-28T04:05:42+5:30
पं.स.मार्फत पाठविलेली यादी १४३ व शिक्षक सेनेमार्फत पाठविलेली यादी ३८५ अशी परीक्षा परवानगीची एकूण ५२८ ची यादी कन्नड तालुक्यात ...

कन्नड तालुक्यातील ५२८ शिक्षकांच्या कार्योत्तर परीक्षा परवानगी यादी निकाली !
पं.स.मार्फत पाठविलेली यादी १४३ व शिक्षक सेनेमार्फत पाठविलेली यादी ३८५ अशी परीक्षा परवानगीची एकूण ५२८ ची यादी कन्नड तालुक्यात मंजूर झालेली आहे. या यादीच्या मंजुरीसाठी कन्नड तालुक्यातील शिक्षक सेनेचे सर्व तालुका संघटक, केंद्र अध्यक्ष, महिला आघाडी यांच्या सहकार्याने, तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्यामार्फत प्रस्ताव जमा करून त्यातील त्रुटी पूर्ण करून कन्नड पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाच महिन्यापूर्वी सादर केल्या होता. त्यासाठी शिक्षक सेनेने आंदोलन (ढोलकीबजाव, भजन आंदोलन)सुद्धा केले होते. त्यानुसार गुरुवारी शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल, उपशिक्षणाधिकारी तथा कन्नड तालुका गटशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी तालुक्यातील ५२८ शिक्षकांच्या परीक्षा परवानगीचा प्रश्न निकाली काढला, अशी माहिती शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी दिली.