आयुक्तांच्या बदलीची शक्यता मावळली
By Admin | Updated: July 9, 2014 00:51 IST2014-07-09T00:23:25+5:302014-07-09T00:51:56+5:30
औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या बदलीची सध्या तरी कमी शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतरच त्यांची बदली होईल, अशी चिन्हे आहेत.

आयुक्तांच्या बदलीची शक्यता मावळली
औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या बदलीची सध्या तरी कमी शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतरच त्यांची बदली होईल, अशी चिन्हे आहेत.
राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चांना अधूनमधून वेग येत असल्यामुळे अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संचिका मुख्यमंत्र्यांकडे पडून आहे. त्यावर निर्णय होईल, असे चित्र सध्या तरी नाही. त्यामुळे आयुक्त डॉ.कांबळे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या चर्चा फक्त चर्चाच ठरत आहेत. आयुक्तांचे मागील वर्षीच प्रमोशन झाले आहे. औरंगाबादची मनपा ‘ड’ वर्गात आहे. आयुक्तांचे प्रमोशन सचिवपदावर झालेले आहे. ‘ड’ वर्गात सचिवपदाचे अधिकारी जास्त काळ राहत नाहीत. त्यामुळे आयुक्तांची बदली होण्याची चर्चा मागील महिन्यापासून सुरू आहे. मनपा उपायुक्त सुरेश पेडगावकर यांना लवकरच कार्यमुक्त करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. २६ एप्रिल रोजीच त्यांना कार्यमुक्त करण्याचे शासनादेश आहेत.
कुठेही काम करण्यास तयार- आयुक्त
बदलीच्या संदर्भात आयुक्त डॉ.कांबळे यांना विचारले असता ते म्हणाले, आपली कुठेही काम करण्याची तयारी आहे. शासनाच्या सेवेत असल्यामुळे शासनाचा निर्णय मान्य राहील.