शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महापालिका निवडणुकीतही ‘महाशिवआघाडी’ची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:07 IST

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाचे पडसाद

ठळक मुद्देमहापालिकेच्या निवडणुकीत युती होणे अशक्य काँग्रेस-राष्ट्रवादीला अच्छे दिन येण्याचे संकेत

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाशिवआघाडी सत्तेत आल्यास औरंगाबाद महापालिकेतही राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपाच्या निवडणुकीतही महाशिवआघाडी निवडणुकीला सामोरे जाईल. या आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला महापालिकेत कधी नव्हे ते आता ‘अच्छे दिन’येण्याची शक्यता आहे. भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन तिन्ही पक्षांचे इच्छुक चांगलेच कामाला लागले आहेत.

औरंगाबाद शहरात प्रथमच प्रभाग पद्धतीने महापालिकेची निवडणूक घेण्यात येणार आहे. प्रभाग पद्धतीत आजपर्यंत ज्या महापालिकांमध्ये निवडणूक घेण्यात आली तेथे भाजपला बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. त्यामुळे औरंगाबादेतही प्रभाग पद्धतच असावी यावर भाजपचा सर्वाधिक भर आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागातर्फे सध्या प्रभाग पद्धतीचे कामही सुरू आहे. २१ नोव्हेंबर रोजी प्रभाग पद्धतीचा प्रारूप आराखडा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त अशा तीन सदस्यांच्या समितीसमोर जाईल. डिसेंबरअखेरीस आरक्षणासाठी ड्रॉ पद्धतीचा अवलंब केल्या जाणार आहे.

महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत.  काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षांच्या सहकार्याने बहुमताचा आकडा महापालिकेत गाठता येऊ शकतो. महापालिकेत ११५ सदस्य आहेत. बहुमतासाठी ५८ नगरसेवक लागतात. मागील ३४ वर्षांपासून महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. प्रत्येक महापौर, उपमहापौर निवडणुकीत युतीला अपक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागल्या आहेत. युतीला औरंगाबादकरांनी कधीच स्पष्ट बहुमत दिले नाही. प्रभाग पद्धतीत होणाऱ्या निवडणुकीत अपक्ष निवडून येण्याची शक्यता कमी आहे. 

महाशिवआघाडीला फायदाप्रभाग पद्धतीत महाशिवआघाडीला जास्त फायदा होईल, असा अंदाज आहे. अनेक प्रभागांमध्ये या तिन्ही पक्षांचा मुकाबला फक्त भाजपसोबत राहील. मुस्लिमबहुल भागात एमआयएमसोबत मुकाबला करावा लागले. प्रभाग पद्धतीत तीन हिंदुबहुल भागाला एक मुस्लिमबहुल भाग  आल्यास महाशिवआघाडीची सत्ता एकहाती येऊ शकते. काही प्रभागांमध्ये असे समीकरणही जुळत असल्याचे कळते.

महापालिकेतील पक्षीय बलाबलशिवसेना    - २९भाजप    - २३एमआयएम    - २३काँग्रेस    - १२अपक्ष    - १८बीएसपी    - ०४राष्ट्रवादी    - ०४रिपाइं (डी)    - ०२एकूण    - ११५

महाशिवआघाडी होऊ शकतेसध्या प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महाशिवआघाडी करण्यासंदर्भात विचार होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन ही निवडणूक लढविल्या जाऊ शकते.- अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख शिवसेना

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र