पुढील आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता
By Admin | Updated: July 6, 2016 23:54 IST2016-07-06T23:50:37+5:302016-07-06T23:54:57+5:30
औरंगाबाद: चालू आठवड्यात मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. पुढील आठवड्यात मात्र विभागात चांगला पाऊस होईल,

पुढील आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता
औरंगाबाद: चालू आठवड्यात मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. पुढील आठवड्यात मात्र विभागात चांगला पाऊस होईल, असा अंदाज असल्याचे हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे.
मराठवाड्यात चार दिवसांपासून चांगला पाऊस बरसत आहे. रविवारपर्यंत अजूनही विभागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. ७ जुलै रोजी कोकण, मध्यम महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ८ जुलै रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे वेधशाळेने म्हटले आहे. स्कायमेट या संस्थेनेही १० जुलैपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
नांदेड येथील एमजीएमच्या हवामान संशोधन केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी मराठवाड्यात १२ ते १५ जुलैनंतर चांगला पाऊस होईल असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, अल निनोचा प्रभाव कमी होऊन हळूहळू त्याचे रूपांतर ला निनोमध्ये होणार आहे. येत्या दोन, तीन दिवसांत अल निनो सर्वसाधारण पातळीवर येईल. त्यानंतर त्यांचे ला निनोमध्ये रूपांतर होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे मराठवाड्यात १२ ते १५ जुलैनंतर चांगला पाऊस होईल. मराठवाड्याच्या दृष्टीने आॅगस्ट आणि सप्टेंबर हे दोन्ही महिने चांगल्या पावसाचे ठरणार आहेत, असेही ते म्हणाले.
येत्या दोन, तीन दिवसांत अल निनो सर्वसाधारण पातळीवर येईल. त्यानंतर त्यांचे ला निनोमध्ये रूपांतर होईल. त्यामुळे १२ ते १५ जुलैनंतर चांगला पाऊस होईल.