परतणारे प्रेमीयुगुल पोलिसांच्या ताब्यात

By Admin | Updated: August 10, 2014 02:21 IST2014-08-10T02:16:34+5:302014-08-10T02:21:40+5:30

मुरुड : गेल्या तीन आठवड्यांपासून फरार झालेल्या एका प्रेमीयुगुलास मुरुड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे लातूर रेल्वेस्टेशनवर ताब्यात घेतले़ हे प्रेमीयुगल

In the possession of the returning lover of police | परतणारे प्रेमीयुगुल पोलिसांच्या ताब्यात

परतणारे प्रेमीयुगुल पोलिसांच्या ताब्यात




मुरुड : गेल्या तीन आठवड्यांपासून फरार झालेल्या एका प्रेमीयुगुलास मुरुड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे लातूर रेल्वेस्टेशनवर ताब्यात घेतले़ हे प्रेमीयुगल पुण्याहून नांदेडकडे परतत होते़ याप्रकरणी युवकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लातूर तालुक्यातील करकट्टा येथील एक १७ वर्षीय मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी नांदेड येथे आजीकडे राहण्यास गेली होती़ या आजीच्या शेजारी सुरेश कांबळे (मुळ रा़ उमरखेड, ता़ यवतमाळ) हा राहत होता़ दोघेही शेजारी राहत असल्याने या दोघांची ओळख झाली़ सुटी संपल्यानंतर ही मुलगी गावाकडे परतली़ त्यानंतर आरोपी सुरेश कांबळे हा १० जुलै रोजी मुरुड येथे आला़ त्याने सदरील मुलीस माझ्यासोबत विवाह कऱ मी तुझ्याशी मोबाईलवर बोललो आहे़ अन्यथा तुझी बदनामी करतो असा दम भरला़ त्यामुळे हे दोघेही गायब झाले़
दरम्यान, मुलीच्या वडिलांनी मुरुड पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला़ हे युगुल जवळपास २५ ते २६ दिवस पुण्यास राहून नांदेडकडे शुक्रवारी पहाटे रेल्वेने परतत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़
त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून लातूर रेल्वे स्टेशनवरुन या दोघांना शुक्रवारी पहाटे ताब्यात घेतले़ याप्रकरणी आरोपी सुरशे कांबळे याच्याविरुध्द मुरुड पोलिस ठाण्यात कलम ३६३, ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोहेकॉ उस्तुर्गे करीत आहेत़

Web Title: In the possession of the returning lover of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.