अखेर खत वाटपासाठी मिळाल्या पॉस मशीन..!
By Admin | Updated: July 3, 2017 23:52 IST2017-07-03T23:51:34+5:302017-07-03T23:52:17+5:30
जालना : जिल्ह्यासाठी मंजूर खताचे योग्य पद्धतीने वितरण करण्यासाठी पॉस मशीनद्वारे खत वाटपाचे कृषी विभागाचे नियोजन होते. मात्र, मागणी करूनही मशीन उपलब्ध न झाल्यामुळे नेहमीप्रमाणेच खत विक्री सुरू होती.

अखेर खत वाटपासाठी मिळाल्या पॉस मशीन..!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यासाठी मंजूर खताचे योग्य पद्धतीने वितरण करण्यासाठी पॉस मशीनद्वारे खत वाटपाचे कृषी विभागाचे नियोजन होते. मात्र, मागणी करूनही मशीन उपलब्ध न झाल्यामुळे नेहमीप्रमाणेच खत विक्री सुरू होती. जिल्हा परिषद कृषी विभागाला सोमवारी ६३१ मशीन उपलब्ध झाल्या असून, खत वाटप अधिक सुलभ होणार आहे.
खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्याला १६१८०० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात खत उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात येणाऱ्या खताचा काही व्यापाऱ्यांकडून होणारा काळा बाजार रोखला जावा, त्याच भागातील शेतकऱ्यांना विक्री व्हावी, खत विक्रीच्या नोंदी योग्य पद्धतीने ठेवता याव्यात यासाठी यंदाच्या खरिपात कृषिसेवा केंद्रातून ई-पॉस मशीनद्वारे खते विक्री करण्याचे नियोजन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले.
त्यासाठी काही खासगी कंपन्यांकडे ई-पॉस मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी नोंदविण्यात आली. परंतु अन्य जिल्ह्यातही खत वाटपासाठी ई-पॉस मशीनची मागणी असल्याने जिल्हा परिषद कृषी विभागाला खरिपाच्या सुरुवातीला या मशीन उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे खतांची विक्री मागील वर्षीप्रमाणेच सुरू आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद कृषी विभागास पहिल्या टप्प्यात ६३१ ई-पॉस मशीन उपलब्ध झाल्या आहेत. या पूर्वी ज्या कृषिसेवा केंद्रचालकांनी या मशीनसाठी नोंदणी केली आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन ई-पॉस मशीनचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व तालुक्यातील कृषिसेवा केंद्रावर या मशीन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.