कृषी संजीवनी योजनेस शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
By Admin | Updated: August 6, 2014 02:22 IST2014-08-06T01:10:30+5:302014-08-06T02:22:13+5:30
शिरूर अनंतपाळ : कृषी ग्राहकांकडील थकबाकी तात्काळ वसूल व्हावी आणि त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना १ आॅगस्ट पासुन सुरू केली

कृषी संजीवनी योजनेस शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
शिरूर अनंतपाळ : कृषी ग्राहकांकडील थकबाकी तात्काळ वसूल व्हावी आणि त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना १ आॅगस्ट पासुन सुरू केली असून, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकऱ्यानी या योजनेस सकारात्मक प्रतिसाद देऊन पहिल्याच दिवसी ६५ हजारापेक्षा अधिक रक्कमेचा भरणा केला आहे़ शिवाय अनेकजण एक रक्कमी वीजबील बाकी भरीत आहेत़
शिरूर अनंतपाळ तालुक्यात ४ हजार २९१ कृषी पंप धारक शेतकरी असून त्यांच्याकडे ९ कोटी १६ लाख ७२ हजाराची थकबाकी आहे़ ही थकबाकी वसूल व्हावी त्याच बरोबर शेतकऱ्यांना वीज बिलात भरगच्च सुट मिळावी म्हणून येथील नूतन सहाय्यक अभियंता सुधीर केंद्रे यांनी तालुक्यातील विविध गावात कृषी संजीवनी मेळावे घेण्यास सुरूवात केली़ यावेळी अभियंता केंद्रे यांनी कृषीपंप धारक शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी योजनेची माहिती दिली़(वार्ताहर)