शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक! ऑरिकला मिळाला विद्युत वितरणाचा परवाना; उद्योगांना मिळणार स्वस्त वीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 17:44 IST

देशभरात जेथे स्वस्त वीज मिळेल, तेथून ती खरेदी केली जाईल व इथल्या उद्योगांना सध्याच्या दरापेक्षा निश्चितच कमी दराने ती वितरित केली जाईल.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील अन्य औद्योगिक क्षेत्रांपैकी ‘ऑरिक’ला वीज वितरणाचा पहिला परवाना मिळाला आहे. यामाध्यमातून ऑरिक टाऊनशीप आता स्वस्त वीज खरेदी करून ती उद्योगांना कमी दरात वितरित करेल. ज्यामुळे ‘डीएमआयसी’मध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना तसेच आहेत त्या उद्योगांसाठी ही सकारात्मक बाब ठरेल, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

शनिवारी औरंगाबादेत शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील ऑरिक सिटीच्या प्रशासकीय कार्यालयात ‘औरा ऑफ ऑरिक’ या ‘विदेशी गुंतवणूक व पर्यटन संधी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत विविध १० देशांचे वाणिज्य राजदूत सहभागी झाले होते. त्याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, ‘डीएमआयसी’ अंतर्गत ऑरिक सिटीला वीज वितरणाचा परवाना मिळाला आहे. आता त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या परिसरातील महावितरणच्या नेटवर्कचा वापर करून उद्योगांना वीज वितरण करण्यात येईल. देशभरात जेथे स्वस्त वीज मिळेल, तेथून ती खरेदी केली जाईल व इथल्या उद्योगांना सध्याच्या दरापेक्षा निश्चितच कमी दराने ती वितरित केली जाईल. त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत शेजारच्या राज्यात स्वस्त वीज मिळते, ही उद्योगांची ओरड यापुढे राहणार नाही.

‘डीएमआयसी’ लवकरच मोठी गुंतवणूक होईल‘औरा ऑफ ऑरिक’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे चांगले फलीत येईल. विविध देशांच्या वाणिज्य राजदुतांना औरंगाबाद शहर, औद्योगिक क्षेत्रातील अत्याधुनिक पायाभूत सुविधा व दळणवळणाच्या सुविधांची माहिती देण्यात आली. ‘सीआयआय’, ‘सीएमआयए’, ‘मासिआ’चे पदाधिकारी, काही उद्योगांचे वरिष्ठ अधिकारी व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी इथल्या सकारात्मक बाबींची माहिती दिली, असे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले.

महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाहीसुभाष देसाई म्हणाले की, कोरोना काळात लॉकडाऊन होते, तरी महाराष्ट्र थांबला नाही, थांबणारही नाही. या काळात गुंतवणुकीसंबंधीचे ३ लाख कोटींचे करार केले. आतापर्यंत त्यातील ७० प्रकल्पांना भूखंड वाटप केले. या माध्यमातून ३ लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरSubhash Desaiसुभाष देसाईelectricityवीज