अश्लील चाळे ; १७ महिलांविरूद्ध गुन्हा

By Admin | Updated: July 11, 2017 00:24 IST2017-07-11T00:22:27+5:302017-07-11T00:24:09+5:30

जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील परभणी रस्त्यावर असलेल्या सतरामैल परिसरात अश्लील चाळे करणाऱ्या महिलांविरूद्ध पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

Pornographic activities; 17 crimes against women | अश्लील चाळे ; १७ महिलांविरूद्ध गुन्हा

अश्लील चाळे ; १७ महिलांविरूद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील परभणी रस्त्यावर असलेल्या सतरामैल परिसरात अश्लील चाळे करणाऱ्या महिलांविरूद्ध पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
जवळा बाजार येथील सतरामैल परिसरात काही महिला सार्वजनिक ठिकाणी येणारे - जाणारे लोकांचे मन आपल्याकडे आकर्षित होईल या उद्देशाने असभ्य व गैरवर्तन करत असताना आढळून आल्याने १७ महिलांवर कारवाई करून औंढा नागनाथ येथील न्यायालयात हजर केले.
ही कारवाई हट्टा ठाण्याचे सपोनि सुनील नाईक, जवळा बाजार पोलीस चौकीचे जमादार शेख खुद्दूस शेख लाल, जमादार शेख जमीर, एस. के. सय्यद, ए. टी. विभुते, काळे यांच्यासह महिला दक्षता समितीच्या पोहेकॉ शालिनी जाधव तसेच ज्योती अन्नदाते, भारती दळवी या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.

Web Title: Pornographic activities; 17 crimes against women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.