सव्वा सहा लाखांनी लोकसंख्या वाढली

By Admin | Updated: July 11, 2014 01:02 IST2014-07-11T00:43:56+5:302014-07-11T01:02:55+5:30

अनुराग पोवळे , नांदेड सद्य परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्याचा जन्मदर हा ज्या तुलनेत कमी व्हायला पाहिजे त्याप्रमाणात कमी झालेला नाही़

The population increased by six lakhs | सव्वा सहा लाखांनी लोकसंख्या वाढली

सव्वा सहा लाखांनी लोकसंख्या वाढली

अनुराग पोवळे , नांदेड
लोकसंख्या नियंत्रणासाठी शासन स्तरावरून विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी केली असली तरी सद्य परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्याचा जन्मदर हा ज्या तुलनेत कमी व्हायला पाहिजे त्याप्रमाणात कमी झालेला नाही़ याबाबीस काही अंशी समाजातील पुरूषांचा न मिळणारा सहभाग हे एक कारण आहे़ जिल्ह्याचा लोकसंख्या वाढीचा दर २ पेक्षा जास्त असल्यामुळे जिल्ह्याची लोकसंख्या ३० ते ३५ वर्षात दुप्पट होणार आहे़
जिल्ह्यात २०१० मध्ये २८ लाख ५४ हजार २५९ लोकसंख्या होती़ तीच लोकसंख्या २०११ मध्ये ३३ लाख ३० हजार ९९४ वर पोहोचली़ २०१२ मध्ये ३४ लाख ४१ हजार ९४९, २०१३ मध्ये ३५ लाख ८९ हजार ६१३ आणि २०१४ मध्ये आजपर्यंत जिल्ह्याची लोकसंख्या ही ३४ लाख ९० हजार ३८ इतकी झाली आहे़ जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या ही मुखेड तालुक्यात आहे़ त्यात ३ लाख १० हजार ८८८, हदगाव २ लाख ७१ हजार १७१, कंधार २ लाख ६० हजार ६८५, किनवट २ लाख ५७ हजार ९१०, लोहा २ लाख ५२ हजार ७६४, देगलूर २ लाख ३६ हजार ७५१, नायगाव १ लाख ८९ हजार ८५९, बिलोली १ लाख ५७ हजार ४७४, भोकर १ लाख ४४ हजार ६८७, मुदखेड १ लाख २१ हजार २२०, हिमायतनगर १ लाख १५ हजार ६५०, अर्धापूर १ लाख १२ हजार ७०३, माहूर १ लाख ४ हजार ५१२, उमरी १ लाख ३ हजार ८ आणि धर्माबाद तालुक्याची लोकसंख्या १ लाख ३ १६ इतकी झाली आहे़ लोकसंख्या नियंत्रणासाठी २००० मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण निश्चित केले आहे़ त्यानुसार नांदेड जिल्ह्यातही लोकसंख्या धोरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़ त्यानुसार जिल्ह्याचा जन्मदर हा १७़३ वर आणणे, मृत्यूदर हा ६़४ वर तर अर्भक मृत्यू जन्मदर हा ज्या तुलनेत कमी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात कमी झालेला दिसून येत नाही़ १९५२ पासून कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविला जात आहे़ लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात २७ जून ते १० जुलै या कालावधीत दांम्पत्य संपर्क पंधरवडा राबविण्यात आला़ तर ११ जुलै ते २४ जुलै या कालावधीत दांम्पत्य स्थिरता पंधरवडा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे़ या कालावधीत जिल्ह्यात आरोग्य ग्रामसभा घेण्यात येणार आहे़ ११ जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी अर्थात ६५ गावांमध्ये ग्रामसभा होणार आहे़ पहिल्यांदाच आरोग्य विषयक बाबींसाठी ग्रामसभा होणार आहेत हे विशेष़ या ग्रामसभेमध्ये सर्व आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बी़ एम़ शिंदे यांनी सांगितले़
जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रूग्णालयामध्ये व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्त्री व पुरूष शस्त्रक्रिया तसेच तांबी शिबीरे घेणे याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे़ त्यात ७२८ स्त्री शस्त्रक्रिया, २४८ पुरूष शस्त्रक्रिया आणि १ हजार ३७५ तांबी बसविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ यासाठी ४६ शस्त्रक्रिया गृह असून त्यात ७२ सर्जनची व्यवस्था करण्यात आली आहे़
शहरी लोकसंख्येत दिवसेंदिवस भरच़़़
चार वर्षांचा विचार करता जिल्ह्याच्या लोकसंख्येत ६ लाख ३५ हजार ७७९ ची भर पडली आहे़ जिल्ह्यात आजघडीला सर्वाधिक ७ लाख ५० हजार ४४१ लोकसंख्या ही नांदेड तालुक्याची आहे़ त्यातही नांदेड शहराच्या लोकसंख्येचा आकडा मोठा आहे़ २०१० मध्ये नांदेडची लोकसंख्या ५ लाख ९१ हजार ३०५ होती़ चार वर्षात त्यात १ लाख ५९ हजार १४४ इतक्या लोकसंख्येची भर पडली आहे़

Web Title: The population increased by six lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.