पोलिसांच्या अंगावर फेकली मिरची पूड
By Admin | Updated: January 10, 2017 23:54 IST2017-01-10T23:43:52+5:302017-01-10T23:54:29+5:30
गेवराई : तालुक्यातील बोरी पिंपळगाव येथे जमीन मोजणीदरम्यान शेतकऱ्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्या अंगावर मिरची पावडर फेकली.

पोलिसांच्या अंगावर फेकली मिरची पूड
गेवराई : तालुक्यातील बोरी पिंपळगाव येथे जमीन मोजणीदरम्यान शेतकऱ्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्या अंगावर मिरची पावडर फेकली. ही घटना सोमवारी दुपारी १२.४५ वाजता घडली. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल लाठीमार केला. या प्रकरणी १४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बोरी पिंपळगाव येथील शेतकरी गणपत दत्तू डोंगरे याची शेतजमीन मोजण्यासाठी पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांच्या आदेशानुसार पोलिस कर्मचारी, तलाठी व भूमी अभिलेख कर्मचारी सोमवारी दुपारी बोरी पिंपळगाव शिवारातील गट क्र . १६७ व १६८ मध्ये गेले होते. जमिनीची बांध निश्चिती करत असताना या कामामध्ये शेजारच्या शेतकऱ्यांनी अडथळा निर्माण केला. मीना परमेश्वर मोटे हिने पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, तर इतरांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. पोलिसांनीही कायदा हातात घेणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार केला.
या प्रकरणी फौजदार अमोल मालुसरे यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा केला व विविध कलमानुसार १४ जणांविरुद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा करण्यात होता. पुढील तपास फौजदार आर. ए. सागडे करत आहेत.
दरम्यान बाबासाहेब साधू मोटे आणि चत्रभुज साधू मोटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे फौजदार सागडे यांनी सांगितले. (वार्ताहर)