जीव टांगणीला !

By Admin | Updated: April 14, 2017 00:52 IST2017-04-14T00:51:07+5:302017-04-14T00:52:17+5:30

बीड शेतकऱ्यांकडे एक लाख क्विंटल तूर शिल्लक असतानाच तूर खरेदी केंद्रे बंद करण्याच्या सूचना नाफेडच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

Poor living beings! | जीव टांगणीला !

जीव टांगणीला !

राजेश खराडे बीड
चार महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्रामधून दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर खरेदी झाली आहे. असे असतानाही शेतकऱ्यांकडे एक लाख क्विंटल तूर शिल्लक असतानाच तूर खरेदी केंद्रे बंद करण्याच्या सूचना नाफेडच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
मोठ्या मुश्किलीने गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात १० ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू आहेत. कधी बारदाणाअभावी तर कधी साठवणुकीअभावी खरेदी केंद्रे बंद अवस्थेत राहत होती. यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचा उद्रेक पहावयास मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे खरीपातील सर्व पिकांचे नुकसान झाले असले तरी तुरीला मात्र पोषक वातावरण होते. त्यामुळे यंदा तुरीचे उत्पादन विक्रमी झाले आहे. १० ठिकाणी खरेदी केंद्रे उभारून देखील सध्या जिल्ह्यात एक लाख क्विंटल तूर शिल्लक आहे. नाफेडची खरेदी केंदे्र १५ मार्चपर्यंतच सुरू राहणार होती. मोठ्या प्रमाणावर तुरीचे उत्पादन शिल्लक असल्यामुळे ही मुदत महिनाभर वाढवण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Poor living beings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.