पूजा, पीयूष कापडिया यांना ‘ग्रीन बिल्डिंग’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:22 IST2017-10-15T01:22:20+5:302017-10-15T01:22:20+5:30

नवसंकल्पनांचा आविष्कार करणारे शहरातील आर्किटेक्ट पूजा व पीयूष कापडिया यांना ‘ग्रीन बिल्डिंग’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 Pooja, Piyush Kapadiya received 'Green Building' award | पूजा, पीयूष कापडिया यांना ‘ग्रीन बिल्डिंग’ पुरस्कार

पूजा, पीयूष कापडिया यांना ‘ग्रीन बिल्डिंग’ पुरस्कार

औरंगाबाद : इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल या राष्ट्रीय संस्थेतर्फे दरवर्षी देशातील सर्वोत्कृष्ट ग्रीन बिल्डिंग्जना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा नवसंकल्पनांचा आविष्कार करणारे शहरातील आर्किटेक्ट पूजा व पीयूष कापडिया यांना ‘ग्रीन बिल्डिंग’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जयपूर येथे आयोजित सोहळ्यात आयजीबीसीचे अध्यक्ष पद्मश्री सी.एन. राघवेंद्रन यांच्या हस्ते पूजा व पीयूष कापडिया यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कापडिया यांनी शांतिनिकेतन कॉलनी येथील प्लॉट नं.१६, ‘हीर-राधा’ येथे उभारलेली अभिनव व ग्रीन बिल्डिंग आवश्यक निकषाप्रमाणे त्यांच्या स्वत:च्या घराची निवड या पुरस्काराकरिता केली गेली. ‘ग्रीन’ निकषामध्ये बांधलेले हे घर महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे घोषित करण्यात आले व यास ‘प्लॅटिनम रेटेड’ हा सर्वोत्कृष्ट दर्जाचा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारासाठी देशभरातून ४२०० नामांकनांतून ११०० वेगवेगळ्या वापरांच्या इमारतीची निवड करण्यात आली होती.
निवासी उपयोगी बंगलोजकरिता ६ नामांकने होती. त्यातून कापडिया यांना पुरस्कार मिळाला. प्रकल्पाच्या सादरीकरणाची मांडणी डॉ. अन्शुल गुजराथी, इको सोल्युशन्स, पुणे यांनी केली, तसेच स्ट्रक्चरल डिझाइन एल.एस. जयगोपाल, कोइमतूर व लॅण्डस्केप डिझाइन आर्कि. योगेंद्र बल्लाळ यांनी स्वीकारली.

Web Title:  Pooja, Piyush Kapadiya received 'Green Building' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.