पूजा नागोरीने मारली बाजी

By Admin | Updated: May 18, 2014 01:24 IST2014-05-18T00:57:28+5:302014-05-18T01:24:16+5:30

औरंगाबाद : लोकमत सखी मंचच्या वतीने सखी महोत्सवात सखी सम्राज्ञी अंतिम स्पर्धेत डॉ. पूजा नागोरीने बाजी मारली असून, विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.

Pooja Nagori has killed me | पूजा नागोरीने मारली बाजी

पूजा नागोरीने मारली बाजी

औरंगाबाद : लोकमत सखी मंचच्या वतीने सखी महोत्सवात सखी सम्राज्ञी अंतिम स्पर्धेत डॉ. पूजा नागोरीने बाजी मारली असून, विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. सारेगमा फेम मंगेश बोरगावकर यांनी ‘मन उधाण वार्‍याचे’, ‘टिक टिक वाजते डोक्यात...’, ‘तुझ्या विना...’ तसेच मराठी व हिंदी गाणे सादर करीत महिलांना ठेका धरण्यास भाग पाडले. लयबद्ध गाण्यांमधून महिलांना सूर, ताल अशा विविध प्रकारचे महत्त्वही त्यांनी समजावून सांगितले. कला जोपासणे ही चांगली बाब असून, मन मोकळे करण्याचे एक व्यासपीठ सखी मंचने तुम्हा महिलांना निर्माण करून दिले आहे, असेही मंगेश बोरगावकर म्हणाले. महोत्सवात सखींनी रांगोळी, मेंदी, ब्रायडल मेकअप, गाणी, नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, सोलो डान्स स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून बक्षिसे मिळविली. सारेगमा फेम मंगेश बोरगावकर यांच्या गाण्यावर सखीने धमाल करीत आनंद लुटला. सखी महोत्सवात सकाळपासून रांगोळी स्पर्धेत महिलांनी देशातील सद्य:स्थितीचे चित्रण करून ‘लेक वाचवा’ यासह अन्य सामाजिक विषय रेखाटले. मेंदी स्पर्धेत सुबकता व कलाकुसरीचा वापर करण्यात आला होता. ब्रायडल मेकअप स्पर्धेत स्पर्धकांनी मराठमोळ्या तसेच बहुभाषक महिलांना सादर करण्याचा प्रयत्न केला. नृत्याविष्कारातही गृहिणी मागे नाहीत, एखाद्या पट्टीतील कलावंताला लाजवेल असा कलाविष्कार दाखवीत त्यांनी आपला ठसा उमटविला. सखी सम्राज्ञी स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये स्पर्धकांनी आपली कल्पकता दाखवून देत उपस्थितांची दाद मिळविली. मेंदी, ब्रायडल मेकअपचे परीक्षक म्हणून वृंदा ताकवाले, वीणा मुथा, फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे परीक्षक म्हणून जेनिफर वडागळे, कल्पना जोशी, रांगोळी स्पर्धेत सीमा खडतकर, उदय भोईर यांनी परीक्षण केले. सोलो डान्ससाठी सायली सराफ, हिना पाली यांनी, तर सखी सम्राज्ञीचे परीक्षण डॉ. स्मिता अवचार, अनिल साळवे यांनी केले. सखी सम्राज्ञी प्राथमिक फेरीचे परीक्षण रेखा मालीवाल, डॉ. उज्ज्वला दहिफळे, अरुणा काबरा यांनी केले. स्पर्धेसाठी गिफ्ट पार्टनर सुवर्ण स्पर्शचे प्रवीण सिंग, रवी मसालेचे अजित जैन यांचा सत्कार सखी मंचच्या अध्यक्ष रेखा राठी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. कार्यक्रमास सखी मंचच्या अध्यक्ष रेखा राठी, कमिटी मेंबर पद्मजा मांजरमकर यांची उपस्थिती होती. सखी सम्राज्ञी प्रथम पुरस्कार - पूजा नागोरी, द्वितीय सुनीता शेळके, तर तृतीय पुरस्कार नीलम वाघमारे यांनी पटकावला. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक- सुरेखा कुबेर, द्वितीय- कोमल भागवतकर, तृतीय- प्राजक्ता पाटील. ब्रायडल मेकअप प्रथम- सुनंदा सोनवणे, द्वितीय- रूपाली बोधक, तृतीय- अनिता गायकवाड. मेंदी स्पर्धेत प्रथम- गायत्री हाके, द्वितीय तृप्ती पाटणी, तृतीय- सुजाता अहिरे. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम- बागेश्री रहाळकर, द्वितीय- जयश्री पाटील आणि सुषमा कांबळे, तृतीय- उषा ताडलिंबेकर. सोलो डॉन्स स्पर्धेत प्रथम- सुनंदा सोनवणे, द्वितीय- रूपाली बोधक, तृतीय- कीर्तना आनंतराव.

Web Title: Pooja Nagori has killed me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.