गारपिटीवर मात करून एक एकरात जोपासली डाळिंबाची बाग
By Admin | Updated: September 4, 2014 01:22 IST2014-09-04T00:46:39+5:302014-09-04T01:22:42+5:30
गजानन सपकाळ , वरूड बु. येथील प्रगतशील शेतकरी सुदाम शेनफड काळे यांनी आपल्या एक एकर शेतीवर जवळपास ३०० डाळिंबाची झाडे लावून जोपासली आहे. व सध्या डाळींब काढणीस आली आहे.

गारपिटीवर मात करून एक एकरात जोपासली डाळिंबाची बाग
गजानन सपकाळ , वरूड बु.
येथील प्रगतशील शेतकरी सुदाम शेनफड काळे यांनी आपल्या एक एकर शेतीवर जवळपास ३०० डाळिंबाची झाडे लावून जोपासली आहे. व सध्या डाळींब काढणीस आली आहे.
गतवर्षी दुष्काळ असतांना परिस्थितीवर मात करीत काळे यांनी मिळेल तेथून टँकरद्वारे पाणी आणून ठिबकची जोडणी करून बागेची जोपासना केली परंतु त्यानंतर गारपीटीने हाती आलेले उत्पन्न जाते की काय अशी भिती होती. या संकटाला खचून न जाता त्यावर मात करत चार वर्षांपासून अगदी पोटच्या मुलाप्रमाणे डाळींब झाडांचा सांभाळ केला. चार वर्षांमध्ये दोन वेळेला गारपिटीने नुकसान झाले. तरीही त्यांची तमा न बाळगता अहोरात्र कष्ट करीत जोपासना करीत कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक ज्ञानदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कुशलतेने डाळींब काढण्यात आली.चार वर्षांमध्ये जवळपास तीन लाख रूपये खर्च झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पाण्याच्या कमतरतेमुळे शेततळ्याची गरज असून त्यासाठी प्रस्ताव पाठविला,परंतू त्यावर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कृषी विभागाने मदत केल्यास काळेंचे अनुकरण दुसरे शेतकरी व जास्तीत जास्त फळबागा निर्माण होईल अशी आशा आहे.
एका एकरमध्ये पाण्याची कमतरता असूनही डाळींबाची बाग फुलविण्यात आली असल्याने केवळ योग्य नियोजनामुळे आणि ठिबक सिंचन पध्दतीमुळे हे शक्य झाले असल्याचे शेतकरी शेनफड यांनी सांगितले. इतर शेतकऱ्यांनाही या पध्दतीचा अवलंब करावा असे ते म्हणाले.