बाजार समितीसाठी पाच केंद्रांवर आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 23:51 IST2016-04-23T23:44:32+5:302016-04-23T23:51:59+5:30

भूम : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी रविवारी पाच मतदान केंद्रांवरून मतदान घेण्यात येणार असून, याची मतमोजणी सोमवारी होणार

Polling on five centers today for the market committee | बाजार समितीसाठी पाच केंद्रांवर आज मतदान

बाजार समितीसाठी पाच केंद्रांवर आज मतदान

 

भूम : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी रविवारी पाच मतदान केंद्रांवरून मतदान घेण्यात येणार असून, याची मतमोजणी सोमवारी होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. संचालकांच्या सतरा जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात असून, या निवडणुकीत १ हजार २६१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तब्बल २५ वर्षानंतर या बाजार समितीसाठी निवडणूक होत असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. तालुक्यात वालवड, ईट, पाथरूड, माणकेश्वर आणि भूम अशा पाच ठिकाणी मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असणारे रणधुमाळी संपून आता मतदानाची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, यानंतर सोमवारी भूम येथील जिल्हा परिषद शाळेत याची मतमोजणी होवून निकाल जाहीर केला जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सय्यद यांनी सांगितले.

Web Title: Polling on five centers today for the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.