शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

पोलखोल! बंदी असतानाही नायलॉन मांजाची घरपोच डिलेव्हरी

By प्रशांत तेलवाडकर | Published: January 13, 2023 12:39 PM

पोलखोल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने ऑनलाइन मागविला मांजा

औरंगाबाद : नायलॉन मांजाने गळा चिरल्याने देशभरात अनेक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. याची दखल घेत खुद्द उच्च न्यायालयाने नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घातली आहे. एवढे नव्हे, तर या घातक मांजाची फेसबुकवरील ऑनलाइन विक्री तत्काळ थांबविण्याचेही आदेश देण्यात आले आहे. आता बाजारात नायलॉन मांजा विक्री होत नसला तरी थेट ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन हा घातक मांजा विकला जातोय. होय, ई-कॉमर्स कंपन्या अजूनही नायलॉन मांजा विक्रीसाठी सतर्क आहेत. याची पोलखोल शहरातील सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे.

इंटरनेटवर ऑनलाइन नायलॉन मांजा विक्री असा शोध घेतल्यास विविध वेबसाइट ओपन होतात. या ई-कॉमर्स कंपन्यांचा भांडाफोड करण्यासाठी शिवशंकर कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते अजय दहिफळे यांनी ७ डिसेंबरला वेबसाइटवर जाऊन नायलॉन मांजाची ऑर्डर बुक केली होती. शहरातील डिलिव्हरी कंपनीकडून १० तारखेला हा मांजा घरपोच आला; मात्र त्या वेळीस दहिफळे हे गावाला गेले होते. १३ तारखेला पुन्हा डिलिव्हरी कंपनीचा कर्मचारी त्यांच्या घरी आला. त्यावेळीस दहिफळे यांनी तो नॉयलॉन मांजा घेतला व मोबाइलमध्ये त्याची संपूर्ण व्हिडीओ शूटिंग केली. त्यानंतर सायबर क्राइम विभागात जाऊन त्या संबंधित ई-कॉमर्स कंपनीविरोधात तक्रार दाखल केली. ई-कॉमर्स कंपनीने आजपर्यंत देशात किती नायलॉन मांजा विकला, याची माहिती कंपनीकडून द्यावी. या कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित कंपनीला पाठविली नोटीसतक्रार दाखल होताच गुन्हे शाखेने ऑनलाइन कंपन्यांची माहिती घेणे सुरू केले व ज्या कंपनीने शहरात मांजा पाठविला त्या कंपनीच्या व्यवस्थापनाला नोटीस पाठविली आहे.

शहानिशा सुरूसोशल मीडियावर नायलॉन मांजा विक्रीच्या अनेक साईट बघण्यास मिळत आहेत. यासंदर्भात आमच्याकडे तक्रार आली आहे. ‘मिशो’ ही ई-कॉमर्स साईट व त्यातील सत्यता पडताळली जात आहे. शहानिशा करून पुढील कारवाई केली जाईल.- राहुल चव्हाण, पोलिस निरीक्षक, सायबर क्राइम

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादkiteपतंग