शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

शंभरपेक्षा अधिक वसाहतींमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी; नागरिक, व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 16:47 IST

rain in Aurangabad : १०० पेक्षा अधिक वसाहतींमध्ये पाणीच पाणी; सखल भागात एकही मोठा अधिकारी फिरकला नाही

ठळक मुद्दे  आभाळ फाटले; मनपाला पाझर फुटला नाही!वॉर्ड अभियंते, वॉर्ड अधिकाऱ्यांची टीम गायबअग्निशमन विभाग मोजक्याच ठिकाणी हजर

औरंगाबाद : मंगळवारी रात्री दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने अर्ध्या शहराची दाणादाण उडविली. शंभरपेक्षा अधिक वसाहतींमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले. अनेक व्यापारी प्रतिष्ठाने पाण्यात गेली. अग्निशमन विभागाने मागील २४ तासांमध्ये आपल्या क्षमतेनुसार फक्त २५ ठिकाणी मदतकार्य केले. अनेक वसाहतींमधील पाण्याचा दुसऱ्या दिवशीही निचरा झाला नाही. महापालिकेच्या डिझास्टर ( Aurangabad Municipal Corporation)  मॅनेजमेंटची टीम फक्त कागदावरच असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. वॉर्ड अभियंते, वॉर्ड अधिकाऱ्यांची टीम नागरिकांच्या मदतीसाठी धावून आली नाही. या संपूर्ण प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी भाजपच्या महिलांनी बुधवारी सायंकाळी मनपा मुख्यालयासमोर जोरदार निदर्शन करीत घोषणांचा पाऊस पाडला. ( Polkhol of Aurangabad Municipal Corporation due to heavy rains; Huge financial losses to citizens, traders) 

मंगळवारी रात्री कमी वेळेत जास्त वेगाने पाऊस झाल्याने नुकसान प्रचंड झाले. प्रशासनाकडील माणुसकीचा झरा पूर्णपणे आटलाय काय? अशी शंका उपस्थित होत आहे. मंगळवारी रात्री ७.१० ते ९.४५ पर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जवळपास शंभर वसाहती पाण्याखाली आल्या. नागरिकांना, व्यापाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू, साहित्य वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अनेक तास पाण्याचा निचरा होत नव्हता. रात्री उशिरा तर अग्निशमन अधिकाऱ्यांचे मोबाइलही डिस्चार्ज झाले. अवघ्या दोन तासांत फायर ब्रिगेडला १०० कॉल प्राप्त झाले. मंगळवारी रात्री ९ ते बुधवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत अग्निशमनच्या वेगवेगळ्या टीमला २६ ठिकाणचे कॉल अटेंड करता आले.

हेही वाचा - आजारी आई-वडिलांचा आधार पावसाने हिरावला

अग्निशमन विभागाने कुठे काम केले?७.३० : सिडको, एन-४, पुंडलिकनगर, सारस्वत बँक परिसर, गुरू सहानीनगर, के.के. दिवेकर यांचे दुकान, एन-३ मधील अजयदीप कॉम्प्लेक्स, छत्रपती महाविद्यालयासमोर, बजाज यांच्यासह अनेक घरांमध्ये साचलेले पाणी काढले.

मंगळवारी रात्री : ८.०० : औरंगपुरा भागात सुरभी कलेक्शनसह अनेक दुकानांमधील पाणी काढले.८.२० : दिवाणदेवडी, फकीरवाडी भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न. अनेक घरांमधील पाणी काढले.८.२० : रोशन गेट भागातील अंडरग्राउंडमध्ये पाणीच पाणी साचले. रात्री उशिरापर्यंत पाणी काढून देण्यात आले.८.४५ : श्रीमान श्रीमतीजवळ एक महिला पाण्यात अडकली होती. अग्निशमन विभागाने महिलेला जीवदान दिले.९.१० : गोमटेश मार्केट, औषधी भवन येथे मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी आणखी एका अग्निशमन टीमने काढले.९.२० : इटखेडा येथे पाण्यात बुडालेली कार बाहेर काढण्यात आली. कारमधील नागरिकांना अगोदरच बाहेर काढले होते.१०.४० : बालाजीनगर येथे अनेक घरांमध्ये पाणीच पाणी झाले. अग्निशमन विभागाने काही घरांमधील पाणी काढले.१०.४० : गेवराई तांडा येथे पुरात एकजण वाहून गेल्याचा कॉल. प्रत्यक्षात घटनास्थळी काहीच सापडले नाही.

बुधवारी सकाळी७.१५ : विभागीय क्रीडा संकुल येथे रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्यात आले.७.३० : बीड बायपासवर सहारा सिटी येथील अनेक घरांमधील पाणी काढण्यात आले.७.५० : एमजीएमसमोरील मोतीवालानगर येथील एका शाळेत पाणीच पाणी झाले, ते काढले.७.५५ : अलाना कंपनीच्या बाजूला नाल्यात माणूस वाहून गेला. नाल्यातील पाणी काढले.८.१५ : रिद्धी-सिद्धी हॉलच्या बाजूला खिवंसरा पार्कमधील पाणी काढण्यात आले.८.३० : झांबड इस्टेट, जाधववाडी येथील अनेक घरांमधील पाणी काढले.१०.०० : उस्मानपुरा, मयूरपार्क, जवाहर कॉलनी, क्रांती चौक आदी २५ ठिकाणी पाणी काढण्याचे काम सुरू केले.

हेही वाचा - धुमशान पावसाने औरंगाबाद महापालिकेची पोलखोल; प्रशासनाने केला तत्परतेचा दावा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका