शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

औरंगाबादमध्ये राजकारण तापले; भाजपचे भागवत कराड यांची कार फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 13:07 IST

दोघा कार्यकर्त्यांनी घराजवळ येऊन केला हल्ला

ठळक मुद्देकराड यांचा तनवाणी यांच्यावर आरोपशिवसेनेचे तनवाणी म्हणाले, हा भाजपचा स्टंट

औरंगाबाद : मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या शासकीय कारवर आणि नूतन कॉलनी येथील घरावर शुक्रवारी रात्री हल्ला  करून दगडफेक करण्यात आली. हा हल्ला भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या समर्थकांनी केल्याचा स्पष्ट आरोप डॉ. कराड यांनी केला आहे, तर हा प्रकार म्हणजे भाजपचा स्टंट असल्याची प्रतिक्रिया तनवाणी यांनी दिली आहे. 

दरम्यान कार आणि घरावर हल्ला झाल्याप्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळाने क्रांतीचौक ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हल्ल्याची घटना शहरात पसरताच रात्री क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या परिसरात शेकडो भाजपसमर्थक दाखल झाले. खा. अमर साबळे हेदेखील क्रांतीचौकात आले. तेथे हल्ल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. दगडफेक करणा-यांना अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीचौक पोलिसांना देण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कराड यांचे नूतन कॉलनी येथे निवासस्थान आहे. रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ते कार्यकर्त्यांशी गप्पा मारत बसले होते. तेव्हा रंगनाथ राठोड (रा. हर्सूल) आणि संतोष सुरे (रा. मयूर पार्क) हे त्यांना भेटायला आले. यावेळी दोघांनी त्यांच्याकडे महापालिकेचे तिकीट मागण्यासाठी आल्याचे सांगितले. यावेळी बाहेर उभे असलेल्या काही लोकांनी अचानक डॉ. कराड यांच्या शासकीय कारवर मागील बाजूने दगड मारून काच फोडली. या प्रकारानंतर राठोड आणि सुरे तेथून निघून गेले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, अनिल गायकवाड, क्रांतीचौक ठाण्याचे निरीक्षक अमोल देवकर घटनास्थळी धावले.  

पोलीस आयुक्तांची भेट आ. अतुल सावे, डॉ. कराड, भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, नगरसेवक अनिल मकरिये, बापू घडमोडे, भावराव देशमुख आणि अन्य पदाधिकाºयांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. यानंतर हे शिष्टमंडळ क्रांतीचौक ठाण्यात गेले आणि रीतसर तक्रार दिली. दरम्यान, आ. अतुल सावे यांनी दगडफेक करणाºयांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले, अशा पद्धतीने जर कृती असेल, तर आम्हीदेखील आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. 

कराड यांचा आरोप; मला धमक्याही आल्याघटनेबाबत डॉ. कराड म्हणाले, ‘लोकमत’शी बोलताना गुरुवारी मी भाजपतून शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल किशनचंद तनवाणी यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे तनवाणी समर्थकांनी शासकीय चारचाकीवर हल्ला केला आहे. तनवाणी समर्थकांनी हा हल्ला केला असून, त्याचा आम्ही निषेध करतो आहोत. तनवाणी यांच्या समर्थकांनी सोशल मीडियातदेखील काही घाणेरड्या पोस्ट केल्या आहेत. सचिन झव्हेरी या प्रकरणात समोर आलेले नाहीत; परंतु संतोष सुरे व इतर चार ते पाच जणांनी मला दमदाटी केली. वर्तमानपत्रात बातम्या द्याल, तर याद राखा, अशी धमकी त्यांनी दिली. तनवाणी यांना ‘सत्तेच्या ढेपेला लागलेला मुंगळा’ असे ‘लोकमत’शी बोलताना केलेले वक्तव्य व त्यानंतर आलेली बातमी तनवाणी व त्यांच्या कार्यकर्त्यांना झोंबल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी दगडफेक केली आहे.

हल्ला म्हणजे भाजपची निव्वळ स्टंटबाजीमाझ्या कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीचे कृत्य होणारच नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी सकाळीच ‘लोकमत’ वाचून हल्ला केला असता. सायंकाळी कशासाठी करतील. मी कार्यालयात बसून आहे. मलाही आताच अशी घटना घडल्याचे कळले. कराड यांच्या मुलासोबत मी थोड्या वेळापूर्वी संवादही साधला. मला बदनाम करण्यासाठी कराड यांनी रचलेला हा स्टंट आहे. - किशनचंद तनवाणी, माजी आमदार.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना