लांबलेल्या निवडणुकीने राजकीय अस्वस्थता
By Admin | Updated: April 7, 2015 01:26 IST2015-04-07T01:04:41+5:302015-04-07T01:26:28+5:30
औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेची पहिली निवडणूक लांबत चालल्याने परिसरातील राजकीय नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार काहींसे हवालदिल होत आहेत.

लांबलेल्या निवडणुकीने राजकीय अस्वस्थता
औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेची पहिली निवडणूक लांबत चालल्याने परिसरातील राजकीय नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार काहींसे हवालदिल होत आहेत. निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असून, त्यासंदर्भात विविध तर्क-वितर्क लढविले जात आहेत. मात्र अशा संभ्रमाच्या वातावरणातही परिसरात राजकीय पक्षांच्या बैठका, सत्कार सोहळे जोरदारपणे सुरू
आहेत.
सातारा-देवळाई महापालिकेत समाविष्ट होण्याच्या चर्चेला न्यायालयाच्या निर्णयानंतर ब्रेक मिळाला. नगर परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने परिसरात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या.
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीबरोबर सातारा-देवळाई नगर परिषदेची निवडणूक पार पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु महापालिक ा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला; परंतु अद्यापही नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. तरीही काही राजकीय पक्षांनी, नेत्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली.
बैठका, सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून आतापासूनच प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. तर काही जण निवडणूक तारीख जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस लांबत चालेल्या नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी बाशिंग बांधून तयार चाललेल्या उमेदवारांमध्ये काहीशी चिंता पसरली आहे. लवकरात लवकर निवडणूक तारीख जाहीर करावी, अशी मागणी राजकीय नेते मंडळींकडून होत
आहे.