शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
2
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
3
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
4
भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
5
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
6
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
7
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
8
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
9
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
10
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
11
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
12
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
13
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
14
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
15
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
16
२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात
17
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
18
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
19
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
20
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
Daily Top 2Weekly Top 5

छाननीत राजकीय पक्षांसह अपक्षांना बसले धक्के; बाद अर्जसंख्या पाहून उमेदवारांना फुटला घाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:52 IST

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत बुधवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी १- अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३, ४ ...

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत बुधवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी १- अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३, ४ आणि ५ मधील उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. तासाभरातच काही उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरू लागली. अनेक तांत्रिक कारणांमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज रद्द करण्यास सुरुवात केली. राजकीय पक्षांसह अपक्षांना बसणारे हे धक्के पाहून बाहेर बसलेल्या अन्य उमेदवारांना ऐन थंडीतही घाम फुटला. दुपारी ४ वाजेपर्यंत तीन प्रभागांतील अनेक उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले.

एमआयएम पक्षाला धक्काएमआयएम पक्षाने प्रभाग क्र. ३ मधून प्रांतोष वाघमारे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्जही भरला. अर्जासोबत सूचक आणि अनुमोदकाचे नाव, प्रारूप मतदार यादीतील टाकले. अंतिम मतदार यादीत सूचक, अनुमोदकाचे नाव दुसऱ्या प्रभागात गेले. त्यामुळे त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रूपा चित्रक यांनी रद्द ठरविला. एमआयएम पक्षासाठी हा मोठा धक्का होता. पक्षातील काही नेते, तज्ज्ञ मंडळींनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे बराच वेळ आपली बाजू मांडली. मात्र, अधिकारी निर्णयावर ठाम होते.

उद्धवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बादप्रभाग क्रमांक ४ मधून उद्धवसेनेने सावित्री वाणी यांना उमेदवारी दिली. अर्जासोबत पक्षाचा बी-फाॅर्मही जोडलेला होता. अर्जातील एक शपथपत्र नोटरी करून दिलेले हवे होते. वाणी यांनी साध्या छापील कागदावर शपथपत्र दिले. हा अर्जही बाद ठरविण्यात आला. सावित्री वाणी आणि त्यांच्यासोबतच्या अन्य उमेदवारांनी, पक्षाच्या नेत्यांनी बराच वेळ चर्चा केली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय कायम ठेवला. तथापि, त्यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज कायम आहे.

वादविवाद वाढलाएका उमेदवाराचा अर्ज बाद ठरविल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पठाण आणि उमेदवाराच्या सर्मथकांमध्ये चांगलाच वाद झाला. त्याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला. यात उमेदवार समर्थकांनी पठाण यांच्यावर काही आरोप केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rejection of nominations shocks political parties, independents in Chhatrapati Sambhajinagar.

Web Summary : Nomination rejections rattled candidates across parties in Chhatrapati Sambhajinagar municipal elections. Technicalities led to cancellations, affecting even prominent candidates from MIM and Shiv Sena (UBT). Disputes arose, highlighting the intense election atmosphere.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६