राजकीय घडामोडींना वेग..!

By Admin | Updated: December 25, 2016 23:58 IST2016-12-25T23:58:10+5:302016-12-25T23:58:10+5:30

कळंब : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी कळंब तालुक्यातील राजकीय सारीपाटावर नव्या घडामोडी नोंदल्या जाणार आहेत.

Political developments speed ..! | राजकीय घडामोडींना वेग..!

राजकीय घडामोडींना वेग..!

कळंब : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी कळंब तालुक्यातील राजकीय सारीपाटावर नव्या घडामोडी नोंदल्या जाणार आहेत. काँग्रेसचे शिवाजी कापसे यांचा समर्थकासह शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित झाला असतानाच ‘आऊटगोर्इंग’ च्या अन्य काही राजकीय घडामोडी घडून येण्याची शक्यता राजकीय वतुर्ळातून ऐकावयास मिळत आहे.
कळंब नगर परिषद निवडणुकीतील विजयाचा जल्लोश अन् पराभवाची कारणमिमांसा संपते न संपते तोच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यामुळेच आगामी फेब्रुवारी महिन्यात होवू घातलेल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नगर परिषद निवडणुकीत स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत विराजमान झाली असली तरी या निकालाने कळंबच्या राजकारणात वेगळेच धु्रवीकरण झालेले आहे. सत्ताधारी काँग्रेसचे नेते शिवाजी कापसे व त्यांचे समर्थक पक्षाच्या धोरणावर नाराज आहेत. कापसे यांचे बहुतांश समर्थक वरिष्ठांनी नगर परिषद निवडणुकीत दुर्लक्ष केल्याचे सांगत आहेत. यातूनच अन्य पक्षात जायचा विचार व पर्याय समोर आला आहे. सोमवारी कळंब येथे झालेल्या शिवाजी कापसे यांच्या गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त करून हातात 'धनुष्यबाण' घेण्याच्या निर्णयावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Political developments speed ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.