शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

युनिपोलवर राजरोस राजकीय जाहिराती; मनपा, स्मार्ट सिटीच्या एजन्सींकडून कराराचा भंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:30 IST

राजकीय, धार्मिक आणि तेढ निर्माण करणाऱ्या जाहिराती लावू नयेत, असे करारात नमूद असतानाही त्या लावल्या जात आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी दुभाजकात मोठमोठ्या युनिपोल उभारणीची क्रेझ अलीकडे बरीच वाढली आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटीने विविध खासगी एजन्सींना पोल उभारणी, जाहिरातींचे काम दिले. पण, या एजन्सींकडून कराराचा भंग होत असल्याचे दिसत आहे.

राजकीय, धार्मिक आणि तेढ निर्माण करणाऱ्या जाहिराती लावू नयेत, असे करारात नमूद असतानाही त्या लावल्या जात आहेत. स्मार्ट सिटीने महापालिकेला विश्वासात न घेता एका खासगी एजन्सीला १५२ ठिकाणी युनिपोल उभारणीचे काम दिले. एजन्सीने आतापर्यंत ११०पेक्षा अधिक युनिपोल उभारले. महापालिकेच्या मालमत्ता विभागाने मागील सात वर्षांमध्ये जवळपास ३०० युनिपोल उभारणीची परवानगी दिली. त्यातील जवळपास २००पेक्षा अधिक ठिकाणी युनिपोल उभे आहेत. युनिपोलवर व्यावसायिक जाहिराती असाव्यात, असे निकष आहेत. करारात राजकीय, धार्मिक, दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीच्या जाहिराती लावू नयेत, असे स्पष्टपणे नमूद आहे. त्यानंतरही मागील काही दिवसांपासून राजकीय जाहिरातबाजी सुरू आहे. राजकीय जाहिरातींसाठी महापालिकेचे अधिकृत १५०पेक्षा अधिक होर्डिंग आहेत.

अनधिकृत जाहिरातींवर बंदीमहापालिकेने अलीकडेच अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. काही राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अनधिकृत होर्डिंगची छपाई करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जातील, असा इशारा दिला. त्यामुळे छपाई करणाऱ्यांनी राजकीय होर्डिंग तयार करून देण्यास नकार दिला. त्यामुळे राजकीय नेत्यांनी आता युनिपाेलकडे मोर्चा वळविला आहे.

परस्पर जाहिराती लावतातआमच्या युनिपोलवर काही कार्यकर्ते आणि इतर मंडळी परस्पर होर्डिंग लावून मोकळे होतात. आम्हाला कल्पनाही नसते. मनपाकडून जेव्हा याबाबत विचारणा होते, तेव्हा उत्तर देता येत नाही.-नीलेश क्षत्रिय, प्रो ॲक्टिव्ह एजन्सी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका