आरोपीकडून पोलिसास मारहाण
By Admin | Updated: February 5, 2015 00:53 IST2015-02-05T00:40:29+5:302015-02-05T00:53:27+5:30
जालना : वॉरंट बजावलेल्या आरोपीने सदर बाजार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुखदेव गुणाजी नागरे (वय ५१) यांना मारहाण केल्याची घटना गुरूवारी सकाळी

आरोपीकडून पोलिसास मारहाण
जालना : वॉरंट बजावलेल्या आरोपीने सदर बाजार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुखदेव गुणाजी नागरे (वय ५१) यांना मारहाण केल्याची घटना गुरूवारी सकाळी १० वाजता येथील मूर्गीवेस भागात घडली.
नागरे यांनी एका गुन्ह्यातील आरोपी सय्यद रफिक सय्यद इसाक (रा. लालबाग खांडसरी) यास वॉरंट बजावण्यासाठी गेले असता मूर्गीवेस भागात आरोपीने नागरे यांना मारहाण केली.
यात त्यांच्या नाकाला जबर दुखापत झाली. आरोपीने लोखंडी रॉडने वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो नागरे यांनी चुकविला. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात आरोपी सय्यद रफिकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.