पोलीस दलामध्ये अधिकाऱ्यांचे खांदेपालट
By Admin | Updated: April 19, 2015 00:47 IST2015-04-19T00:41:02+5:302015-04-19T00:47:23+5:30
उस्मानाबाद : जिल्हा पोलीस दलात बदल्यांचे वारे जोरात वाहू लागले आहे़ या प्रक्रियेच्या कालावधीतच पोलीस अधीक्षकांनी २१ शिकावू फौजदारांच्या बदल्या केल्या आहेत़

पोलीस दलामध्ये अधिकाऱ्यांचे खांदेपालट
उस्मानाबाद : जिल्हा पोलीस दलात बदल्यांचे वारे जोरात वाहू लागले आहे़ या प्रक्रियेच्या कालावधीतच पोलीस अधीक्षकांनी २१ शिकावू फौजदारांच्या बदल्या केल्या आहेत़ तर इतर कर्मचाऱ्यांनीही ‘इच्छूक’ ठाणे मिळावे, यासाठी धावपळ सुरू केली असून, रविवारी बदल्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या मुलाखती होणार असल्याचे वृत्त आहे़
जिल्हा पोलीस दलातील बदल्यांची प्रक्रिया यंदा कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे एप्रिल महिन्यातच होण्याची शक्यता आहे़ या अनुषंगाने बदलीस पात्र असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बदलीबाबत वरिष्ठांच्या सूचनेनुसार मत कळविले आहे़ या कर्मचाऱ्यांनीही जिल्ह्यातील ‘इच्छूक’ १७ पोलीस ठाण्यांसह तुळजापुरातील देवी मंदिरात नेमणूक व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे़ तर काहींनी वरिष्ठांमार्फत फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे़ शहर पोलीस ठाण्यातील चार शिकावू फौजदारांची तोंडी आदेशानुसार बदली झाल्याचे समजते़ यात पोउपनि विशाल शहाणे यांची नेमणूक दरोडा प्रतिबंधक पथकात करण्यात आली आहे़ तर जे़डी़सूर्यवंशी यांची परंडा येथे, एस़जी़राठोड यांची नळदुर्ग येथे, डी़व्ही़सिध्दे यांची वाशी येथे बदली करण्यात आली आहे़ तर उस्मानाबाद ग्रामीणचे आऱए़भंडारी यांची तुळजापूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे़ उमरगा येथील एम़एस़बगाड, कळंब येथील एस़एम़माने, मुरूम येथील एम़टीक़ांबळे, नळदुर्ग येथील आऱटी़जमादार यांची शहर पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे़ या बदली प्रक्रियेदरम्यान स्वत:ला व कुटुंबाला सोयीस्कर पडावे, अशा ठिकाणचे पोलीस ठाणे मिळावे, यासाठी कर्मचाऱ्यांनीही हलचाली सुरू केल्या आहेत़ (प्रतिनिधी)