जिल्हाभरात पोलिसांचे ‘आॅपरेशन आॅल आऊट’
By Admin | Updated: May 30, 2017 22:59 IST2017-05-30T22:57:04+5:302017-05-30T22:59:23+5:30
बीड : गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी अचानकपणे राबविली जाणार पोलिसांची ‘आॅपरेशन आॅल आऊट’ मोहीम मंगळवारी राबविण्यात आली.

जिल्हाभरात पोलिसांचे ‘आॅपरेशन आॅल आऊट’
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी अचानकपणे राबविली जाणार पोलिसांची ‘आॅपरेशन आॅल आऊट’ मोहीम मंगळवारी राबविण्यात आली. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या मोहिमेत २७ ठाण्यांतील १२०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा सहभागी झाला होता.
ही मोहिम रात्रीच्यावेळी जास्तकरून राबबिली जाते. परंतु यावेळी प्रथमच ही मोहिम दुपारी राबविण्यात आली. दुपारी दोन वाजता या मोहिमेस सुरूवात झाली. जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य महामार्ग व मुख्य रस्ते, चौक आदी ठिकाणी रस्त्यांवर नाकाबंदी करून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत होती. तसेच गंभीर गुन्ह्यांसह छोट्या-मोठ्या गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दिवसभर झालेल्या या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली.