भररस्त्यावर पोलिसांचीच फ्री स्टाईल तुंबळ हाणामारी
By Admin | Updated: July 6, 2016 00:20 IST2016-07-06T00:02:05+5:302016-07-06T00:20:33+5:30
औरंगाबाद : मद्यधुंद अवस्थेत असलेले साध्या वेशातील चार पोलीस अन् चार्लीमध्ये सोमवारी रात्री रेल्वेस्टेशन रोडवर तुंबळ हाणामारी झाली.

भररस्त्यावर पोलिसांचीच फ्री स्टाईल तुंबळ हाणामारी
औरंगाबाद : मद्यधुंद अवस्थेत असलेले साध्या वेशातील चार पोलीस अन् चार्लीमध्ये सोमवारी रात्री रेल्वेस्टेशन रोडवर तुंबळ हाणामारी झाली.
रेल्वेस्टेशन रस्त्यावरील पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयाजवळ स्वीफ्ट कार उभी करून साध्या वेशातील चार पोलीस मोठ्या आवाजात लावण्या ऐकत होते. कारमधील टेपच्या कर्णकर्कश आवाजामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांचे लक्ष विचलित होत होते. चौघेही मद्यधुंद असल्याने टेपचा आवाज कमी करण्याची त्यांची तयारी नव्हती. वेदांतनगर चौकीचे चार्ली पोलीस बुलेटवरून गस्त घालत असताना त्यांच्या नजरेस स्वीफ्ट कार पडली. कारमधील टेपचा आवाज कमी करण्याची विनंती चार्ली पोलिसाने केली. त्याचवेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या साध्या वेशातील पोलिसाने चार्लीच्या श्रीमुखात भडकावली. ‘कोणत्या पोलीस ठाण्यात काम करतो, आम्हाला ओळखत नाही का’, अशी दरडावणीच्या स्वरात विचारणा केली.