शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
7
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
8
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
9
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
10
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
11
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
12
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
13
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
14
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
15
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
16
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
17
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
18
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
19
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

बायपासवर पोलिसांची ‘स्पीडगन’नजर; अपघात टाळण्यासाठी वाहतूक शाखेची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:03 IST

वाहनांची गती मोजण्यासाठी ‘स्पीडगन’ची नजर ठेवली आहे.

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : अपघात सत्र रोखण्यासाठी वाहतूक शाखेने बायपासवरील जडवाहनांना सहा तास बंदी केली आहे. दरम्यान, मोकळ्या रस्त्यावर भरधाव येणाऱ्या वाहनांची गती मोजण्यासाठी ‘स्पीडगन’ची नजर ठेवली आहे. तीन दिवसांत पंधरा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 

रस्त्यावर वाहनांची गती मोजून सचित्र दाखवीत दंडात्मक कारवाई होत असल्याने ‘आता नाही चालणार भरधाव गतीचा बहाणा’ असा संदेश वाहनचालकांत पसरला आहे. झाल्टा फाटा जुना चिकलठाणा रोडदरम्यान वाहतूक शाखेचे कर्मचारी गनद्वारे रस्त्यावर नजर लावून थांबत आहेत. नको दंडात्मक कारवाई म्हणून निर्धारित करून दिलेली गती (४०) च्या अधिक गतीने दिसणारे वाहन टार्गेट केले जाते . घाईने जाणे म्हणजे अपघातास निमंत्रण देणे किंवा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.  

तीन स्पीडगनपैकी एकच सुरूबायपास, जळगाव रोड तसेच वाळूज रोडसाठी तीन स्पीडगन वाहतूक शाखेकडे होत्या; परंतु त्यापैकी दोन बिघडल्या असून, एकच गन सुरळीत सुरू आहे; परंतु झाल्टा फाटा येथे वाहनचालकांची गती मंदावल्याने सध्या तरी अपघात टळले आहेत. विरुद्ध दिशेने जाणाऱ्यांना रोखण्यासाठी तत्परता दाखवावी, त्याचाही फायदा होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

वाहतूक मर्यादा ओलांडू नयेवाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असून, स्पीडगन पुन्हा रस्त्यावर उतरवल्याने वाहनधारक उडवाउडवीची उत्तरे देणे शक्य नाही. वेगमर्यादा, दुभाजक कट, ओव्हरटेक असे फलक लावले असून, लवकरच झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्यात येणार आहे. फौजदार प्रताप नवघरे, पोहेकॉ नंदू नरवडे, खुशाल पाटील, सचिन आल्हाट आदी कर्मचारी कार्यरत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसAccidentअपघात